loader
Breaking News
Breaking News
Foto

त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त ‘हे चांदणे फुलांनी’ संगीत मैफिल उत्साहात संपन्न

सावंतवाडी : श्री सद्गुरू संगीत, कला व सांस्कृतिक मंडळ आणि सावंतवाडी नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या ‘हे चांदणे फुलांनी...’ या विशेष संगीत मैफिलीचे नववे वर्ष मंगळवारी दि. २४ नोव्हेंबर रोजी जनरल जगन्नाथराव भोसले शिवउद्यान, सावंतवाडी (सावंतवाडी गार्डन) येथे उत्साहात संपन्न झाले. यंदाची दुष्काळजन्य परिस्थिती लक्षात घेता शेतकऱ्यांच्या जीवनाशी निगडित गाणी निवडून मंडळातर्फे ही मैफिल शेतकऱ्यांना समर्पित करण्यात आली. या कार्यक्रमाचे उद्घाटन शिवसेना जिल्हा प्रमुख, माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक संजू परब यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने करण्यात आले. राज्यात व देशभरात संगीत टिकवून ठेवण्याचं काम खूप व्यक्ती करत असतात परंतु जिल्ह्यातील सांस्कृतिक चळवळ तसेच सावंतवाडी तालुक्यात संगीत कला वाढवण्याचं व पुढील पिढी पर्यंत पोहोचवण्याचं काम निलेश मेस्त्री व किशोर सावंत ही जोडगोळी सद्गुरु संगीत विद्यालयाच्या माध्यमातून करत आहे, असे प्रतिपादन संजू परब यांनी केले व सद्गुरु संगीत कला सांस्कृतिक मंडळास पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या कार्यक्रमाची निर्मिती व संकल्पना गुरुवर्य निलेश मेस्त्री यांची होती. कार्यक्रमाची सुरुवात बसंत रागातील बंदिशीने झाली. त्यानंतर ‘त्या फुलांच्या गंधकोशी’, ‘वारा गाई गाणे’, ‘ये रे घना’, ‘बाई बाई मनमोराचा’, ‘लव लव करी पात’, ‘ऐरणीच्या देवा तुला’, ‘नाविका रे’, ‘भरलं आभाळ’, ‘नभ उतरू आलं’, ‘आम्ही ठाकर’, ‘जीवा शिवाची बैल जोड’, ‘या जन्मावर’ आणि ‘कुऱ्या चालल्या’ अशा विविध गीतांनी मैफिलीला रंगत आणली. अखेरीस वृक्षवल्ली आम्हा सोयरे या भैरवीने या सुरेल मैफिलीची सांगता झाली. या मैफिलीत नितीन धामापूरकर, हेमंत गोडकर, सिद्धी परब, वर्षा धामापूरकर, समृद्धी सावंत, केतकी सावंत, अनामिका मेस्त्री, पूजा दळवी, मानसी वझे, सानिका सासोलकर, चिन्मयी मेस्त्री आणि अलिशा मेस्त्री यांनी प्रभावीपणे गायन सादर करून प्रेक्षकांना खिळवून ठेवले. गायनासोबतच तेवढ्याच तोडीस तोड साथसंगत निलेश मेस्त्री (संवादिनी), मंगेश मेस्त्री (सिंथेसायझर), किशोर सावंत,सिद्धेश सावंत (तबला), निरज मिलिंद भोसले (ढोलक -ढोलकी) अश्विन (गुड्डू) जाधव (ऑक्टोपॅड), दुर्वा सावंत (गिटार) यांनी केली, उत्तम ध्वनीव्यवस्था सुभाष शिरोडकर यांनी सांभाळली तर आपल्या प्रभावी भाषाशैलीने व अभ्यासपूर्ण सूत्रसंचालनाने संजय कात्रे यांनी कार्यक्रमाची सूत्र हाताळली व रसिक प्रेक्षकांचे विशेष लक्ष वेधून घेतले.

टाईम्स स्पेशल

त्रिपुरारी पौर्णिमेच्या चांदण्यासोबत मराठी भावगीतांचा व लोकसंगीताचा सुरेल नजराणा सादर करणाऱ्या या मैफिलीमुळे रसिकांना अविस्मरणीय संगीतानुभव मिळाला रसिकांनी वादक, गायक कलाकारांचे रोख बक्षीसे देऊन कौतुक केले. दर महिन्यातील वैविध्यपूर्ण कार्यक्रमांबरोबरच या कार्यक्रमाने श्री सद्गुरू संगीत विद्यालयाचे अमृत महोत्सवी वर्ष अधिक संस्मरणीय ठरले. विद्यमान नगराध्यक्षया युवराज्ञी श्रद्धाराजे भोसले, माजी नगराध्यक्ष बबनराव साळगावकर, व सौ संजना परब यांनी कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या तर कार्यक्रमाला माजी नगराध्यक्ष संजू परब, नगरसेविका दीपाली भालेकर, प्रा. गोवेकर, मालवणी कवी दादा मडकईकर, सोमा सावंत, तानाजी सावंत, वैजनाथ देवण, लक्ष्मीकांत धामापूरकर, रमेश गावडे, संदीप गवस, डॉ. अरुणकुमार चव्हाण, समर्थ सिंग, संजय शेवाळे, अर्चना वझे, नारायण आरोंदेकर, आंबेरकर सर, प्रसाद नाईक, डॉ. हेमंतकुमार सावंत, अन्वया विरनोडकर, शेखर पेडणेकर, पत्रकार हेमंत खानोलकर, शैलेश मयेकर यांच्यासह जिल्हाभरातील अनेक मान्यवरांनी व संगीतप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg