loader
Breaking News
Breaking News
Foto

बँक ऑफ इंडिया केशळी शाखेच्या बचत खात्यातून परस्पर ३ लाख ९९ हजार इतकी रक्कम लंपास, अज्ञातावर गुन्हा दाखल

दापोली (चंद्रशेखर) : अज्ञात इसमाने ऑनलाइन व्यवहारांच्या माध्यमातून फिर्यादीची ३ लाख ९९ हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी दापोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मूळ केळशी कांदेवाडी येथील व सध्या शिवडी (मुंबई) येथे राहणारे शैलेश गणपत कदम यांचे बँक ऑफ इंडिया केळशी शाखा येथे बचत खाते आहे. या खात्यामधून १२ ते २२ ऑक्टोबर या कालावधीत ३ लाख ९९ हजार इतकी रक्कम कोणीतरी अज्ञात इसमाने कदम यांच्या संमत्तीशिवाय फसवणूक करण्याच्या उद्देशाने ट्रान्सफर करून कदम यांची फसवणूक केल्याची तक्रार दापोली पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. या तक्रारी वरून अज्ञात इसमाविरोधात दापोली पोलीस ठाण्यात बिनएस कलम ३१८(२), माहिती तंत्रज्ञान अधिनियमाच्या कलम ६६(डी) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस निरीक्षक महेश तोरस्कर करत आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg