loader
Breaking News
Breaking News
Foto

रत्नागिरी व राजापूर न्यायालय बॉम्बने उडवण्याची धमकी ठरली अफवा

​रत्नागिरी : ​रत्नागिरी जिल्हा व सत्र न्यायालयाच्या इमारतीमध्ये बॉम्ब ठेवण्यात आल्याचा एक निनावी ईमेल प्राप्त झाल्यानंतर सोमवारी दुपारी संपूर्ण जिल्हा प्रशासन आणि पोलीस यंत्रणेची प्रचंड धावपळ उडाली. या धमकीच्या ईमेलमुळे न्यायालयात आणि परिसर परिसरात खळबळ उडाली होती. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत न्यायालय इमारत आणि परिसर रिकामा केला व दुपारी दोन वाजल्यापासून व्यापक सर्च ऑपरेशन हाती घेतले. सलग चार तास चाललेल्या या शोधमोहिमेनंतर न्यायालयात कोणतीही संशयास्पद वस्तू अथवा बॉम्ब आढळला नसल्याने पोलीस आणि प्रशासनाने सुटकेचा निःश्वास सोडला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

​या घटनेची सविस्तर माहिती देताना अप्पर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांनी सांगितले की, दुपारी दोन वाजेच्या सुमारास जिल्हा सत्र न्यायालयात बॉम्ब ठेवल्याचा ईमेल प्राप्त झाला होता. या माहितीच्या आधारे डॉग स्क्वॉड, बॉम्ब शोधक व नाशक पथक (BDDS) तसेच पोलीस दलातील विविध तुकड्यांच्या मदतीने न्यायालय इमारतीचा कानाकोपरा छानून काढण्यात आला. सलग चार तास सुरू असलेल्या या अत्यंत बारकाईने केलेल्या सर्च ऑपरेशनदरम्यान काहीही संशयास्पद आढळून आलेले नाही. त्यामुळे हे सर्च ऑपरेशन आता अधिकृतपणे थांबवण्यात आले आहे. ​अप्पर पोलीस अधीक्षक महामुनी यांनी पुढे बोलताना स्पष्ट केले की, असाच एक धमकीचा ईमेल राजापूर न्यायालयातही प्राप्त झाला असून तेथेही सध्या पोलीस आणि सुरक्षा पथकांकडून तपास व शोधमोहीम वेगाने सुरू आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg