loader
Breaking News
Breaking News
Foto

रक्तदानाच्या चळवळीला तळकटमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद!

दोडामार्ग, (प्रतिनिधी) - रक्तदान हेच श्रेष्ठ दान, या सामाजिक भावनेतून तळकट येथे आयोजित करण्यात आलेल्या सहाव्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिरात ३५ जणांनी सहभाग नोंदवला, तर २६ जणांनी प्रत्यक्ष रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली. विशेष म्हणजे, एका महिला भगिनीनेही रक्तदान करून महिलांसाठी प्रेरणादायी आदर्श निर्माण केला. सातत्याने रक्तदान करणारे गोविंद देसाई (१५ वेळा रक्तदान) आणि गोविंद गवस (९ वेळा रक्तदान) यांचा यावेळी विशेष सन्मान करण्यात आला. श्री अष्टविनायक मित्रमंडळ तळकट, सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्ग शाखा दोडामार्ग, तळकट ग्रामपंचायत, प्राथमिक आरोग्य केंद्र तळकट व ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या शिबिराला जिल्हा परिषद सदस्य तथा भाजपा तालुकाध्यक्ष दीपक गवस, सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानचे विभागीय अध्यक्ष तथा गोवा समन्वयक संजय पिळणकर, दोडामार्ग तालुकाध्यक्ष भूषण सावंत, डॉ.राणे, उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडी रक्तपेढीचे डॉ. कुनालवार, रेडकर, बागेवाडी, रविना, कांबळे, गोविंद गवस, रमेश शिंदे, उपसरपंच रमाकांत गवस, माजी शिक्षक दुर्गाराम गवस, शिवप्रसाद नाटेकर, संदीप वेटे, तात्या बांदेकर, प्रज्योत देसाई, दत्तप्रसाद सावंत, ग्रामपंचायत सदस्य विवेक मळीक, अमोल मळीक, माजी सरपंच एम. डी. धुरी आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. राणे यांनी ग्रामीण भागातील आरोग्य सुविधांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधले. ग्रामीण भागात प्रगत सुविधांनी युक्त रुग्णवाहिका उपलब्ध असणे ही काळाची गरज आहे. दोडामार्ग तालुक्यात अशा ॲडव्हान्स रुग्णवाहिकेची नितांत आवश्यकता असून, आरोग्याच्या पुरेशा सुविधा उपलब्ध नसल्यामुळे अनेकदा रुग्णांची गैरसोय होते, असे त्यांनी स्पष्ट केले.

टाईम्स स्पेशल

भाजपा तालुकाध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य दीपक गवस यांनी तळकट गावातील रक्तदान उपक्रमाचे कौतुक केले. तळकट गावातून ५१ रक्तदाते तयार होणे ही निश्चितच अभिमानास्पद बाब आहे. रक्ताची गरज निर्माण झाल्यानंतर धावपळ करण्यापेक्षा नियमित रक्तदानाची सवय समाजात रुजणे आवश्यक आहे. याबाबत गावपातळीवर विचारविनिमय करून जनजागृती केली जाईल. सरपंच सुरेंद्र सावंत-भोसले हे आपल्या कामातून गावाच्या विकासासाठी नेहमीच अग्रेसर असतात. आगामी काळात तळकट येथे भाजपाच्या वतीनेही रक्तदान शिबिर आयोजित करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg