loader
Breaking News
Breaking News
Foto

रक्तदानातून ‘सेवा संकल्प’ला सामाजिक बांधिलकीची जोड - गणेश राणे

देवगड (प्रतिनिधी) - देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर या कालावधीत देशभरात ‘सेवा संकल्प अभियान’ राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीचे औचित्य साधून देवगड पंचायत समितीच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या रक्तदान शिबिराचे उद्घाटन पंचायत समितीचे सभापती गणेश राणे यांच्या हस्ते करण्यात आले. देवगड पंचायत समितीच्या माध्यमातून समाजोपयोगी, आवश्यक तसेच जनतेला चांगला संदेश देणारे विविध उपक्रम राबविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. देवगड पंचायत समितीची समाजामध्ये एक वेगळी ओळख निर्माण व्हावी, तसेच पंचायत समितीच्या माध्यमातून लोकहिताचे उपक्रम सातत्याने राबविले जावेत, या उद्देशाने असे कार्यक्रम आयोजित करण्यात येत असल्याचे सभापती गणेश राणे यांनी यावेळी सांगितले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg