loader
Breaking News
Breaking News
Foto

माजगाव सातेरी मंदिरात म्हालटकवाड्यातील सांस्कृतिक कार्यक्रमाने शुभारंभ

सावंतवाडी - माजगाव येथील श्री सातेरी मंदिरात नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशी म्हालटकरवाडा येथील महिला पुरुष बालगोपाळ मंडळी रविवार दिनांक 11ऑक्टोंबर रोजी सकाळी मंदिरात आलीU गावचे पुरोहित सचिन माजगावकर आणि मानकरी यांनी धार्मिक विधी पूर्ण केल्यानंतर म्हालटकरवाड्यातील मंडळींना देवीला नऊवारी साडी नेसवून फुलांनी सुशोभित करून खणा नारळाची ओटी भरण्यात आली. सायंकाळी विविध सास्कृतीक कार्यक्रमाचे उद्घाटन देवस्थानचे मानकरी तातू चौगुले, सावंतवाडी पंचायत समिती सदस्य जितू गावकर, देवस्थान कमिटी अध्यक्ष आनंद सावंत, सावंत परिवारातील मानकरी सुरेश सावंत, भाऊ घाडी, रामा जाधव, मनोहर कासार, संजय कानसे आदी यांच्या हस्ते करण्यात आले. म्हालटकरवाड्याच्या वतीने मान्यवरांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

संध्याकाळच्या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये म्हालटकरवाड्यातील कलाकारानी आपली कला सादर करून उपस्थितीतांची मने जिंकली यामध्ये फुगडी, गणपती, ओ माय फ्रेंड गणेशा, लाल बांगडी ग्रुप, जय जय महाराष्ट्र, लावणी, राधा, आदिवासी, ज्योतिबा डान्स, विशाल, बल्ली आणि गॅंग, साडेतीन शक्तीपीठ, असे बहारदार नृत्याचे कार्यक्रम करण्यात आले. तसेच खास आकर्षण रेडीचा गणपती 1976 ची आख्यायिका चे सादरीकरण करून ग्रामस्थांना एका जाग्यावर खेळवून ठेवत सर्व रसिकाची मने जिंकली. सांस्कृतिक कार्यक्रमानंतर राञी उत्साहाच्या वातावरणात भजनाचा कार्यक्रम संपन्न झाला. नवरात्र उत्सवामुळे माजगाव सातेरी मंदिरात भक्तीमय आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg