loader
Breaking News
Breaking News
Foto

माय भारत रत्नागिरी आणि शिव स्वराज्य फाउंडेशन, महाराष्ट्र यांच्या माध्यमातून सेवा पखवाडा आणि वृक्षारोपण अभियान संपन्न

देवळे (प्रकाश चाळके) - दिनांक 17 सप्टेंबर 2026 ते 2 ऑक्टोबर 2026 या कालावधीमध्ये, माय भारत रत्नागिरी (युवा कार्यक्रम व खेळ मंत्रालय भारत सरकार) यांच्या माध्यमातून राबविल्या जाणाऱ्या सेवा पखवाडा आणि वृक्षारोपण अभियानाला उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. शिव स्वराज्य फाउंडेशन,महाराष्ट्र या संस्थेच्या माध्यमातून लांजा तालुक्यातील कला,वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालया-लांजा , विट्ठल रखुमाई मध्यवर्ती विकास मंडळ-माजळ आणि विट्ठल रखुमाई मंदिर(बाळगोपाळ मित्र मंडळ) - वेरवली या ठिकाणी हे अभियान राबविले गेले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी स्वच्छता अभियान आणि फणस, केशर आंबा, नारळ, वड आदी. वृक्षरोपांची लागवड करून अभियान संपन्न झाले. अभियान राबविण्यासाठी सम्राट विजय पाटील, जिल्हा युवा अधिकारी, माय भारत रत्नागिरी यांनी प्रोत्साहन दिले. शिव स्वराज्य फाउंडेशनचे संस्थापक प्रताप पवार, अध्यक्ष चंद्रशेखर धावणे, कार्याध्यक्ष दिनेश पवार, खजिनदार संदीप परब, संचालक किशोर सावंत,विकास चव्हाण, संदेश माजळकर,किरण परब, प्रदीप माजळकर, उमेश पवार यांनी विशेष प्रयत्न केले.

टाईम्स स्पेशल

तसेच मान्यवर म्हणून कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालया-लांजाच्या प्राचार्या सुवर्णा देऊसकर, शिव स्वराज्य फाउंडेशनचे सल्लागार डॉ.स्वरूप एकलुरे, प्रा.सतीश मराठे, प्रा.अमोल मेस्त्री, श्रीधर माजळकर, ह.भ.प.चंद्रकांत राणे बुवा हे उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg