loader
Breaking News
Breaking News
Foto

दिवाळी फराळाचा स्वाद आता सातासमुद्रापार...! टपाल विभागाची परदेशात फराळ पाठवण्याची सुविधा; नागरिकांना घरबसल्या पार्सल पाठवण्याची संधी

रत्नागिरी : दिवाळी हा केवळ प्रकाशाचा सण नसून नात्यांमधील आपुलकी आणि गोडवा जपण्याचा उत्सव आहे. परदेशात राहणाऱ्या आपल्या नातेवाइकांना आणि मित्रपरिवाराला घरच्या फराळाची चव चाखता यावी, यासाठी टपाल विभागामार्फत फराळाचे पार्सल परदेशात पाठवण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. या उपक्रमाचा लाभ रत्नागिरी जिल्ह्यातील नागरिकांनाही घेता येणार आहे, अशी माहिती रत्नागिरी विभागाचे डाकघर अधीक्षक ज्ञानेश कुलकर्णी यांनी दिली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

नोकरी, व्यवसाय आणि शिक्षणानिमित्त अनेकजण परदेशात स्थायिक झाले आहेत. दिवाळीच्या सणाला त्यांच्यापर्यंत घरचा फराळ पोहोचवण्यासाठी नागरिकांकडून विशेष प्रयत्न केले जातात. टपाल विभागाच्या या सुविधेमुळे परदेशात राहणाऱ्या आप्तस्वकीयांना चकली, लाडू, चिवडा, करंजी यांसारख्या पारंपरिक फराळाची गोडी चाखता येणार आहे. परदेशात आपल्या माणसांना घरच्या फराळाची गोडी चाखता यावी हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. नागरिकांचा वाढता प्रतिसाद पाहता यंदा आम्ही सेवेचा परीघ आणखी वाढवला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील नागरिकांना परदेशातील नातेवाइकांना दिवाळीची भेट पाठवायची असल्यास जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये संपर्क साधून उपलब्ध सुविधेचा लाभ ध्यावा व दिवाळीचा गोडवा सातासमुद्रापार पोहोचवावा असे आवाहन ज्ञानेश कुलकर्णी यांनी केले आहे.

टाइम्स स्पेशल

फ्री-पिकअप सुविधा - नारिकांची कोणतीही गैरसोय होऊ नये म्हणून पोस्ट विभागाने यंदा एक पाऊल पुढे टाकत शहरातील मिठाई दुकानदार तसेच जर नागरिकांना पोस्टामार्फत परदेशात फराळ पाठवायचा असेल तर व्हॉटसअप क्रमांक 8669919860 वर किंवा नजीकच्या पोस्टात संपर्क साधल्यास पोस्टाचे कर्मचारी थेट घरून / दुकानातून पार्सल कलेक्ट करणार आहेत.तसेच सुरक्षित पॅकिंगद्वारे पार्सल पाठवण्याची सुविधा -फराळ परदेशात पाठवताना योग्य पॅकिंग आणि वाहतुकीच्या नियमांचे पालन करणे महत्त्वाचे असते. टपाल विभागाच्या नियमानुसार पार्सल स्वीकारले जाते आणि पुढील प्रक्रियेसाठी पाठवले जाते. पार्सलचा खर्च संबंधित देश, वजन आणि लागू असलेल्या टपाल दरांनुसार निश्चित होतो. परदेशात फराळ पाठवण्यापूर्वी संबंधित देशातील खाद्यपदार्थ आयातीचे नियम तपासणेही आवश्यक आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg