loader
Breaking News
Breaking News
Foto

महात्मा गांधी जयंती निमित्त कोकण रेल्वे आणि नवनिर्माण कनिष्ठ महाविद्यालय संयुक्त विद्यमाने स्वच्छता जनजागृती फेरी

रत्नागिरी, (प्रतिनिधी) - कोंकण रेल्वे रत्नागिरी आणि नवनिर्माण ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छता ही सेवा - २०२६ च्या अभियानांतर्गत प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले. स्वच्छतेच्या प्रति जनसामान्यांमध्ये जागरूकता निर्माण करणे त्याचबरोबर स्वच्छ आणि सुंदर रेल्वे परिसराच्या निर्मितीसाठी सर्वसामान्य जनतेची भागीदारी चे महत्व पटवून देणे या उद्देशाने प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले. सदर प्रभात फेरी दरम्यान स्वच्छतेच्या संबंधित काही फलकांचे प्रदर्शन करत फेरीचा उद्देश जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी विद्यार्थ्यांनी स्वच्छतेच्या संदर्भात विविध प्रकारच्या घोषणा देण्यात आल्या. प्रभात फेरीची सुरुवात रत्नागिरी एमआयडीसी मधील कांचन हॉटेल पासून सकाळी आठ वाजून ३० मिनिटांनी सुरू करण्यात आली. प्रभात फेरी टाईप थ्री रेल्वे कॉलनी च्या समोरून रेल्वे स्टेशन पर्यंत काढण्यात आली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg