loader
Breaking News
Breaking News
Foto

राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने जपला माणुसकीचा धर्म; आर्यन वराडकर, वेदांत पडवळ यांनी वृद्ध आजींना सुखरूप पोहोचवले घरी!

वरवेली (गणेश किर्वे) - सामाजिक बांधिलकी आणि माणुसकीचे दर्शन घडवणारी घटना गुहागर तालुक्यात घडली. गुहागर येथील सरकारी रुग्णालयाजवळील रस्त्यावर एक वृद्ध आजी उन्हात एकट्याच बसलेल्या आढळून आल्या. त्या आपल्या घराचा रस्ता विसरल्या होत्या. तसेच त्यांना व्यवस्थित चालताही येत नव्हते. अशा परिस्थितीत त्या असहाय्य अवस्थेत असल्याचे लक्षात येताच राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे शहराध्यक्ष आर्यन वराडकर, राष्ट्रवादी सोशल मीडिया अध्यक्ष वेदांत पडवळ आणि रुद्र पाटील यांनी तत्काळ आजींची विचारपूस केली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

त्यांना पिण्यासाठी पाणी व खाण्यासाठी बिस्किटे देऊन धीर दिला. त्यानंतर आजींच्या घराचा पत्ता शोधून त्यांना सुखरूप त्यांच्या घरी पोहोचवले. राजकारणासोबतच सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवून गरजू आणि असहाय्य व्यक्तींना मदतीचा हात देण्याचे काम या तरुणांनी केले. त्यांच्या या तत्परतेमुळे एका वृद्ध आजीला मोठा दिलासा मिळाला. समाजकार्य हे केवळ पदापुरते मर्यादित नसून, गरजेच्या वेळी माणुसकीने मदतीसाठी धावून जाणे हेच खरे समाजकार्य आहे, याचा प्रत्यय या घटनेतून आला.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg