loader
Breaking News
Breaking News
Foto

शिवरायांच्या इतिहासाचा जागर; बाल किल्लेदार किल्ले उभारण्यात दंग!

संगमेश्वर (मकरंद सुर्वे) - शाळांना सुट्ट्या पडल्याने तालुक्यातील गावा-गावातील बालगोपाळ किल्ले बनविण्यात व्यस्त झाले आहेत. इतिहासाचे प्रेम निर्माण व्हावे याकरिता तालुक्यातील अनेक सामाजिक संस्था, युवा मंडळे, इतिहासप्रेमी नागरिक गेल्या काही वर्षांत किल्ले बनवण्याच्या स्पर्धा अनेक ठिकाणी आयोजित करत असल्याने शहरासंह अनेक गावातील बालगोपाळ सुट्टीच्या कालवधीत किल्ले बनवण्यात व्यस्त असलेले दिसून येत आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

याकरिता आठ ते दहा मुले एकत्र येऊन किल्ल्यासाठी आवश्यक वस्तू गोळा करताना 'टीम वर्क'चे धडे गिरवत आहेत. विविध माध्यमातून किल्ले बनवत आहेत. यासाठी दगड, माती, विटा यांचे तुकडे रचून किल्ल्यावर धान्याचे कोठार, विहीर, तलाव, मावळे, मंदिर, बुरुज, तोफा, किल्ल्याची तंटबंदी साकारली जात आहे. किल्याची रंगरंगोटी करणे, मावळे जमा करणे, तोफा जमा करणे, याकरिता बच्चेमंडळी मोठी धावपळ करुन वापर करित आपला किल्ला सर्वोत्तम बनवण्यासाठी प्रयत्न दिसत आहेत.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg