loader
Breaking News
Breaking News
Foto

तालुका स्तरिय स्पर्धेत नॅशनल हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज दापोलीचे व्हॉलीबॉल स्पर्धेत घवघवीत यश

दापोली :- जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय रत्नागिरी व तालुका क्रीडा अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने एन. डी. गोळे हायस्कूल हर्णे येथे आयोजित करण्यात आलेल्या १९ वर्ष वयोगटातील व्हॉलीबॉल स्पर्धेत नॅशनल हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज दापोलीच्या ज्युनिअर कॉलेजच्या सरस्वती विद्यामंदिर कॉलेजच्या संघावर मात करत दापोली तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला. खेळाडूंचे व मार्गदर्शक शिक्षकांचे मुख्याध्यापक अय्युब मुल्ला, प्रशालेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यशस्वी खेळाडूंना प्रशालेचे मुख्याध्यापक अय्युब मुल्ला यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. तसेच शिक्षक अशफाक खान, जमीर जमादार आणि तन्वीर अराई यांचे मार्गदर्शन मिळाले. मुस्लिम एज्युकेशन सोसायटीचे गव्हर्निंग बॉडी चेअरमन लियाकत रखांगे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष जावेद मणियार, सचिव इकबाल परकार, ज्युनिअर कॉलेज समितीचे अध्यक्ष आरिफ मेमन यांनी यशस्वी खेळाडू व मार्गदर्शक शिक्षक यांचे अभिनंदन केले व जिल्हास्तरावर होणाऱ्या स्पर्धेस शुभेच्छा दिल्या.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg