चिपळूण (संतोष पिलके) : महावितरणतर्फे आयोजित राज्यस्तरीय आंतरपरिमंडळ क्रीडा स्पर्धा २०२६-२७ मध्ये कोल्हापूर येथे पार पडलेल्या क्रिकेट स्पर्धेत कल्याण-रत्नागिरी परिमंडळाच्या संघाने अंतिम सामन्यात छत्रपती संभाजीनगर संघावर मात करत विजेतेपद पटकावले. अत्यंत चुरशीच्या झालेल्या अंतिम सामन्यात प्रतिकूल परिस्थितीतून जिद्द, चिकाटी आणि सांघिक खेळाच्या जोरावर विजय मिळवत कल्याण-रत्नागिरी संघाने ऐतिहासिक कामगिरी केली. अंतिम सामन्यात विजयासाठी छत्रपती संभाजीनगर संघाच्या शेवटच्या जोडीला ३६ चेंडूंत अवघ्या ५ धावांची आवश्यकता होती. त्यामुळे सामना कल्याण-रत्नागिरी संघाच्या हातातून निसटण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र, कल्याण-रत्नागिरी संघाने जिद्द, चिकाटी, अचूक गोलंदाजी आणि योग्य नियोजनाच्या जोरावर प्रतिस्पर्धी संघाचा शेवटचा गडी बाद केला आणि रोमहर्षक विजयावर शिक्कामोर्तब केले. शेवटच्या क्षणापर्यंत रंगलेल्या या सामन्यात मिळविलेला विजय खऱ्या अर्थाने अविस्मरणीय ठरला.
विशेष म्हणजे, गेल्या दोन ते तीन वर्षांपासून कल्याण-रत्नागिरी संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागत होते. मात्र, यंदा विजेतेपदाला गवसणी घालत संघाने अनेक वर्षांची प्रतीक्षा संपवली. या ऐतिहासिक विजयामुळे संघातील खेळाडूंमध्ये नवचैतन्य आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, महावितरण परिवारासाठी ही अभिमानाची बाब ठरली आहे. या विजयी संघात चिपळूण विभागातील चार खेळाडूंचा समावेश होता. प्रवीण राऊत, प्रवीण फाळके, विनय मोहिते आणि नंदकुमार कोत्रे यांनी संघाचे प्रतिनिधित्व करत विजयात महत्त्वपूर्ण सहभाग नोंदविला. त्यामुळे चिपळूण विभागाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
या स्पर्धेत कल्याण-रत्नागिरी परिमंडळातील खेळाडूंनी विविध क्रीडा प्रकारांत सुवर्ण, रौप्य आणि कांस्य पदकांचीही कमाई केली. सर्व पदकविजेत्या खेळाडूंसह क्रिकेट संघातील खेळाडू आणि प्रशिक्षकांचे अभिनंदन करण्यात येत आहे. कल्याण-रत्नागिरी परिमंडळासाठी अभिमानास्पद ठरलेल्या या विजयामुळे चिपळूण विभागातील चारही खेळाडूंचे विशेष कौतुक होत आहे. खेळाडूंची जिद्द, सांघिक एकजूट आणि मेहनतीच्या जोरावर मिळविलेल्या या यशाचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.





.jpg)



















4.jpg)





























































































9.jpg)


























_(1)1.jpg)
_(1).jpg)












































_(1)_(1).jpg)





1.jpg)
_(1).jpg)
.jpg)


































.jpeg)



















































.jpg)


















.jpg)











































































































































































































































































































































































































.jpg)

.jpg)














_(1).jpg)























2.jpg)




















































.jpg)




































8.jpg)


















































































































































































.jpg)

.jpg)


































































_(1).jpg)





















































































































































































































































































































































































7.jpg)




























_(1).jpg)






























13.jpg)















_(1)_(1).jpg)

















































































.jpg)


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)




















































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.