सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जलसंधारणाच्या कामांना गती देण्याच्या पार्श्वभूमीवर असनीये येथे लोकसहभागातून पाच वनराई व कच्चे बंधारे उभारण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. कोकण संस्थेच्या पुढाकाराला ग्रामपंचायत, महिला बचत गट आणि गावातील युवकांचा उत्स्फूर्त सहभाग लाभत आहे.
पावसाचे पाणी अडविणे, पाणीसाठा निर्माण करणे आणि भूजल पुनर्भरणाला चालना देणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे. कामापूर्वी पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात वाहून जाणाऱ्या ठिकाणांची पाहणी करून बंधाऱ्यांसाठी योग्य जागांची निवड करण्यात आली. गावातील युवकांनी श्रमदानातून प्रत्यक्ष कामात सहभाग घेतला असून, ग्रामपंचायत आणि बचत गटांनीही आवश्यक सहकार्य केले आहे. बंधारे पूर्ण झाल्यानंतर पावसाचे पाणी अडविले जाऊन जमिनीत पाणी मुरण्यास मदत होईल. त्यामुळे विहिरी व अन्य जलस्रोतांच्या पाणीपातळीत वाढ होण्यास तसेच भविष्यातील पाणीटंचाईचा सामना करण्यास मदत होणार आहे.
कोकण संस्था सामाजिक बांधिलकीतून विविध उपक्रम राबवत असून, जलसंधारणाच्या माध्यमातून गावाला जलस्वावलंबी करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. ग्रामपंचायत, बचत गट, युवक आणि ग्रामस्थांच्या एकत्रित सहभागातून उभारले जाणारे हे बंधारे लोकसहभागातून जलसंधारणाचे उदाहरण ठरणार आहेत. यावेळी कोकण संस्थेचे अध्यक्ष दयानंद कुबल, जितू सावंत आणि चंदन नाईक सह गावातील अनेक युवक उपस्थित होते.

























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)
























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)
















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.