गुहागर तवसाळ (सचिन कुळये) : यंदा पावसाचे प्रमाण कमी झाल्याने आगामी काळात पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन मौजे तवसाळ, बाबरवाडी येथील ग्रामस्थांनी जलसंवर्धनासाठी पुढाकार घेतला आहे. पावसाचे वाहून जाणारे पाणी अडवून त्याचा जमिनीत साठा वाढवणे आणि भविष्यातील पाणीटंचाईवर मात करणे या उद्देशाने ग्रामस्थ व महिला मंडळाच्या उत्स्फूर्त श्रमदानातून बंधारा बांधणीचे काम हाती घेण्यात आले. या सामाजिक उपक्रमात बाबरवाडी मुंबई मंडळाचे अध्यक्ष अशोक जोशी, ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष संदीप जोशी, ग्रामस्थ मंडळी, महिला मंडळ तसेच मुंबईहून आलेल्या सदस्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला. विशेष म्हणजे ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक सिद्धेश्वर लेंडवे यांनीही प्रत्यक्ष श्रमदान करून या उपक्रमाला मोलाचे सहकार्य केले.
बंधारा बांधणीच्या कामासाठी राजेश जोशी यांनी ३०० पिशव्यांची उपलब्धता करून देत महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्यांच्या या सहकार्याबद्दल ग्रामस्थांकडून विशेष आभार व्यक्त करण्यात आले. गावातील पाण्याची भविष्यातील गरज ओळखून ग्रामस्थांनी एकजुटीने केलेला हा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद आहे. विशेषतः महिला मंडळाने पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून श्रमदानात घेतलेला सहभाग प्रेरणादायी ठरला आहे. गावाच्या विकासासाठी आणि पाणी संवर्धनासाठी सर्वांनी एकत्र येऊन केलेले हे कार्य सामाजिक एकोपा आणि गावाप्रती असलेली जबाबदारी अधोरेखित करणारे आहे.
या उपक्रमासाठी प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष सहकार्य करणाऱ्या सर्व ग्रामस्थ, महिला मंडळ, मुंबई मंडळाचे सदस्य आणि ग्रामपंचायत कर्मचारी यांचे दीपक जोशी यांनी अभिनंदन करून सर्वांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. गावाच्या विकासासाठी केवळ चर्चा नव्हे, तर प्रत्यक्ष कृती महत्त्वाची असते, याचे उत्तम उदाहरण बाबरवाडी ग्रामस्थांनी आपल्या श्रमदानातून घालून दिले आहे.







_(1).jpg)























2.jpg)




















































.jpg)




































8.jpg)


















































































































































































.jpg)

.jpg)


































































_(1).jpg)





















































































































































































































































































































































































7.jpg)




























_(1).jpg)






























13.jpg)















_(1)_(1).jpg)

















































































.jpg)


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)






































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.