loader
Breaking News
Breaking News
Foto

केळंबे येथे लांजा नगरपंचायतीकडून कचऱ्याची बेकायदेशीर आग , परिसरात प्रदूषणाचा लोट ; नागरिकांचे आरोग्य धोक्यात

केळंबे-लांजा(सिराज नेवरेकर) लांजा नगरपंचायत प्रशासनाने शहरातील संपूर्ण कचरा आणि घाण केळंबे गावच्या हद्दीत आणून टाकली असून, या कचऱ्याला थेट आग लावून देण्यात आली आहे. या कचऱ्याच्या धुरामुळे संपूर्ण केळंबे परिसर आणि आजूबाजूच्या गावांमध्ये प्रदूषणाचे प्रचंड साम्राज्य निर्माण झाले असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

लांजा नगरपंचायत 1912 साली स्थापना झाली तीन पंचवार्षिक निवडणूका झाल्या.मात्र लांजा नगरपंचायतीने डंपिंग ग्राउंड ची अद्याप व्यवस्था केलेली नाही शहरातील कच-याची नगरपंचायत हद्दीत विल्हेवाटही लावली जात नाही. लांजा शहरातून गोळा केला जाणारा ओला व सुका कचरा, प्लास्टिक आणि इतर घातक कचरा केळंबे येथील जागेत टाकला जात आहे. कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्याऐवजी प्रशासनाकडून सोपा मार्ग म्हणून या कचऱ्याला थेट आग लावली जात असल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला आहे. या आगीमुळे प्लास्टिक आणि इतर रासायनिक कचरा जळत असल्याने अत्यंत विषारी आणि दुर्गंधीयुक्त धूर हवेत पसरत आहे. यामुळे मनुष्याच्या आरोग्याची भिती निर्माण झाली असून नगरपंचायत प्रशासनाच्या निष्काळजी पणाबाबत जनतेतून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

टाइम्स स्पेशल

या विषयाबाबत विवली-केळंबे ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसभेत शिवसेना ठाकरे गटाचे अभिजित राजेशिर्के यांनी विरोध केला होता.केळंबे ग्रामपंचायतीकडून नगरपंचायत प्रशानाला कचरा टाकू नये असे लेखी कळविले होते. पंरतु लांजा नगरपंचायतीकडून कोणतीही कार्यवाही नाही.कचरा उघड्यावर पेटवणे हा राष्ट्रीय हरित लवादाच्या नियमांचे थेट उल्लंघन आहे. नियम धाब्यावर बसवून नगरपंचायतीकडून हे कृत्य केले जात असल्याने पर्यावरणप्रेमींमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. प्रशासनाच्या या अघोरी कारभाराविरोधात केळंबे येथील ग्रामस्थांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. हा कचरा टाकणे तात्काळ बंद करावे आणि आग लावून प्रदूषण करणाऱ्या दोषीवर कडक कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे. प्रशासनाने वेळीच पावले न उचलल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा स्थानिक नागरिकांनी दिला आहे .

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg