loader
Breaking News
Breaking News
Foto

पालकमंत्री नामदार सामंत यांची भेट घेवून चिपळूण विभागीय वनअधिकारी कार्यालयातील कर्मचार्‍यांची तक्रार करणारः फारुख नेवरेकर

केळंबे-लांजा - रत्नागिरी तालुक्यातील आरे-वारे समुद्रकिनार्‍यावरील स्थानिक छोटे व्यावसायिक आणि स्टॉलधारकांवर वनविभागाकडून कोणतीही पुर्वकल्पना न देता करण्यात आलेल्या कारवाईमुळे या गंभीर प्रकाराची दखल घेत जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी वनविभागाच्या या एकतर्फी कारवाईवर नाराजी व्यक्त करुन संबंधित अधिकार्‍यांची चांगलीच खरडपट्टी काढत निलंबनाचे आदेश दिले. पालकमंत्री यांनी घेतलेली रोखठोक भूमिका ही स्वागतार्ह असून शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत असल्याचे लांजा तालुका शेतकरी लाकुड व्यापारी संघटनेचे अध्यक्ष फारूख नेवरेकर यांनी सांगितले असून चिपळूण येथील विभागीय वन अधिकारी कार्यालयात काही कर्मचार्‍यांचा मनमानी कारभार वाढला आहे. एकाच जागेवर ठाण मांडून बसलेल्या काही कर्मचारी, अधिकारी यांची अन्यत्र तातडीने बदली करण्यात यावी, अशी मागणी पालकमंत्री उदय सामंत आणि आमदार किरण सामंत यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे करणार असल्याचे लांजा तालुका शेतकरी लाकुड व्यापारी संघटनेचे अध्यक्ष फारूख नेवरेकर यांनी पत्रकारांना सांगितले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

तसेच सदर कार्यालयात काही कर्मचारी अनेक वर्षांपासून एकाच पदावर कार्यरत असल्याने मनमानी कारभारामुळे आणि मक्तेदारीमुळे सर्वसामान्य नागरीकांना विशेषत: शेतक-यांना विविध कामांसाठी नाहक मानसिक आणि आर्थिक त्रासालाही सामोरे जावे लागत आहे. कार्यालयातील वाढत्या गैरव्यवहारामुळे जनतेतून तीव्र असंतोष आहे. साध्या-सोप्या प्रकरणांसाठीही सामान्य नागरिक आणि लाकूड व्यावसायिकांना चकरा माराव्या लागतात. नियमांचा बाऊ करून जाणीवपूर्वक अडवणूक करणे आणि मनमानी पद्धतीने फाईल्स ऑनलाईनचे कारण पुढे करून अडकवून ठेवणे हा येथील रोजचाच प्रकार बनला आहे. या कर्मचा-यावर कोणाचा वचक राहीलेला नाही. त्यामुळे सर्वसामान्य जनतेच्या कामांची अडवणूक होत आहे, अशी तक्रार आम्ही जिल्ह्याचे पालकमंत्र्यांकडे करणार असल्याचे श्री. नेवरेकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

टाईम्स स्पेशल

सामान्य जनता आणि व्यावसायिकांची होणारी ही पिळवणूक थांबवण्यासाठी आणि वनविभागाचा कारभार पारदर्शक करण्यासाठी चिपळूण विभागीय वन कार्यालयातील संबंधित जबाबदार कर्मचार्‍यांची तातडीने अन्यत्र बदली करावी, अशी मागणी पालकमंत्री उदय सामंत आमदार भैय्यां सामंत यांच्याकडे केली जाणार असल्याचे शेतकरी लाकूड व्यापारी संघटनेचे अध्यक्ष फारूख नेवरेकर यांनी पत्रकारांना सांगितले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg