loader
Breaking News
Breaking News
Foto

गोविंदगडावर त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त भव्य मशाल महोत्सवाचे आयोजन, गोवळकोट येथे ऐतिहासिक सोहळा; शिवकालीन देखावा, मशाल प्रज्वलन व आतषबाजीचे आकर्षण

चिपळूण (ओंकार रेळेकर)त्रिपुरारी पौर्णिमेच्या निमित्ताने गोवळकोट येथील ऐतिहासिक गोविंदगडावर मंगळवार, दि. २४ नोव्हेंबर रोजी भव्य मशाल महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. श्री देव सोमेश्वर व श्री देवी करंजेश्वरी देवस्थान, गोवळकोट–पेठमाप, चिपळूण यांच्या वतीने आयोजित या महोत्सवात धार्मिक विधी, ऐतिहासिक शिवकालीन देखावा, भव्य शोभायात्रा आणि मशाल प्रज्वलन सोहळा पार पडणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सायंकाळी ५ वाजता श्री देवी करंजेश्वरी मंदिरात पूजन होणार असून, ५.१५ वाजता ऐतिहासिक शिवकालीन देखाव्यासह भव्य शोभायात्रेने गोविंदगडावर प्रस्थान करण्यात येणार आहे. सायंकाळी ६ वाजता गोविंदगडावर शिवप्रतिमेचे विधिवत पूजन होणार असून, ६.३० वाजता गडावर मशाली प्रज्वलित करून भव्य आतषबाजी करण्यात येणार आहे. रात्री ८ वाजता श्री देवी करंजेश्वरी मंदिरात गोंधळ घालून महोत्सवाची सांगता होणार आहे. गोवळकोटच्या ऐतिहासिक वारशाला उजाळा देणारा आणि शिवकालीन परंपरा, भक्ती व शौर्याची अनुभूती देणारा हा मशाल महोत्सव असल्याने परिसरातील शिवप्रेमी, भाविक व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg