सावंतवाडी (प्रतिनिधी): ओंकार हत्तीला नेमळे आणि परिसरातून त्वरित बाहेर काढा, अन्यथा फटाके उडवून त्याला हुसकावून लावू, असा आक्रमक इशारा नेमळे गावातील आंबा बागायतदारांनी आणि लोकप्रतिनिधींनी वनविभागाला दिला आहे. यावर उपवनसंरक्षक मिलिश शर्मा यांनी नागरिकांना आवाहन केले की, फटाक्यांच्या आतषबाजीमुळे हत्ती आक्रमक होऊ शकतो आणि तो उधळल्यास मोठी हानी होऊ शकते. त्यामुळे असा कोणताही प्रकार करू नये. दरम्यान आजपासून ओंकार हत्तीला कळपात परत जाण्यास प्रवृत्त केले जात आहे असे त्यांनी आश्वासन दिले आहे. नेमळे परिसरातील आंबा बागायतदारांनी उपवनसंरक्षक कार्यालयात जाऊन मिलिश शर्मा यांची भेट घेतली आणि हत्तीच्या वाढत्या उपद्रवाबाबत तीव्र संताप व्यक्त केला. सध्या आंब्याचा हंगाम सुरू असल्याने शेतकरी मशागतीसाठी बागांमध्ये जात आहेत. हत्तीमुळे बागायतदारांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. झाडांचे नुकसान झाल्यास वनविभाग एकदाच भरपाई देईल, पण वर्षानुवर्षे उत्पन्न देणारे झाड नष्ट झाल्याने शेतकऱ्यांचे भरून न येणारे नुकसान होईल, असा मुद्दा ठाकरे शिवसेना मतदारसंघ प्रमुख रूपेश राऊळ यांनी मांडला. तसेच कुडाळच्या दिशेने गेलेल्या हत्तीला पुन्हा नेमळे गावात का आणले, असा सवाल पंचायत समिती उपसभापती गौरव मुळीक यांनी केला. यावेळी एका वन अधिकाऱ्याने ग्रामस्थांशी उद्धट वर्तन केल्याचा व्हिडिओ दाखवून त्याच्यावर कारवाईची मागणीही करण्यात आली.
उपवनसंरक्षक मिलिश शर्मा यांनी सांगितले की, ओंकार हत्ती तरुण असून तो गेली तीन वर्षे आपल्या कळपापासून दूर आहे. तो स्वतःच्या कुटुंबातील सदस्यांचा शोध घेत आहे आणि कळपात परत जाण्यास उत्सुक आहे. सावंतवाडी आणि कुडाळ वनक्षेत्रपाल तसेच वनविभागाचे पथक नेमळे गावात पोहोचले असून हत्तीला त्याच्या कळपापर्यंत जाण्यासाठी योग्य दिशा दाखवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. फटाके न उडवण्याचे आवाहन: हत्तीच्या भोवती गर्दी झाल्यास किंवा फटाके वाजवल्यास तो घाबरून आक्रमक होईल. अशा वेळी तो कोणत्या दिशेला जाईल हे सांगणे कठीण होईल. त्यामुळे फटाक्यांची आतषबाजी करण्यात येऊ नये असे उपवनसंरक्षक मिलिश शर्मा यांनी स्पष्ट केले. हायकोर्टाची समिती व पुढील निर्णय: हत्ती पकडण्याबाबतचे प्रकरण सध्या उच्च न्यायालयात (हायकोर्ट) प्रलंबित आहे. लवकरच हायकोर्टाची ६ वकिलांची समिती परिसरातील शेतकऱ्यांना भेटून चर्चा करेल आणि आपला अहवाल कोर्टाला सादर करेल. कोर्टाचा निर्णय येईपर्यंत हत्ती पकडण्याची थेट मोहीम राबवता येणार नाही. कायमस्वरूपी निवासाची योजना: हत्तींसाठी कोल्हापूर येथील घाटकरनगर व तिलारी परिसरात निवासस्थान/कॅम्प बनवण्याचा वनविभागाचा विचार आहे. सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात ६ आणि चंदगडमध्ये २ असे एकूण ८ हत्ती आहेत. हायकोर्टाच्या निर्णयानंतर पुढील निर्णय वन विभाग घेणार आहे असे त्यांनी सांगितले.
२००२ पासून सुरू असलेल्या या हत्ती समस्येवर मात करण्यासाठी आणि लोकवस्तीचे संरक्षण करण्यासाठी वनविभाग कटिबद्ध आहे. ओंकार हत्तीचा माग ठेवण्यासाठी १० खाजगी व्यक्ती व वनकर्मचारी रोज त्याच्या पाळतीवर आहेत. यावर मोठा खर्च होत असला तरी मानवी जीवितहानी टळावी यासाठी वनविभाग पूर्ण खबरदारी घेत असल्याचे शर्मा यांनी स्पष्ट केले. यावेळी पंचायत समिती उपसभापती गौरव मुळीक, माजी पंचायत समिती सदस्य रुपेश राऊळ, राजू शेटकर, नेमळे सरपंच दीपिका भैरे, उपसरपंच सखाराम राऊळ, माजी उपसरपंच विक्रम पांगम, नितीन पांगम, लवू चव्हाण, सुहास पिकुळकर, सचिन मुळीक, राजू कोळेकर, लीलाधर राऊळ, बाबी राऊळ, बाळकृष्ण राऊळ, ओंकार राऊळ, निवृत्ती मुननकर, दत्तप्रसाद चव्हाण, राजेश धुरी, सुनील राऊळ, अशोक धुरी यांसह अनेक शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.


_(1).jpg)
_(1).jpg)












































_(1)_(1).jpg)





1.jpg)
_(1).jpg)
.jpg)


































.jpeg)



















































.jpg)


















.jpg)











































































































































































































































































































































































































.jpg)

.jpg)














_(1).jpg)























2.jpg)




















































.jpg)




































8.jpg)


















































































































































































.jpg)

.jpg)


































































_(1).jpg)





















































































































































































































































































































































































7.jpg)




























_(1).jpg)






























13.jpg)















_(1)_(1).jpg)

















































































.jpg)


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)


























































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.