loader
Breaking News
Breaking News
Foto

दापोली तालुका कुंभार समाजाचा विद्यार्थी गुणगौरव सोहळा ,८० गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान; मंडळाच्या वतीने प्रथमच समाजरत्न, समाजभूषण व समाज गौरव आध्यात्मिक सेवा पुरस्कार प्रदान

दापोली : दापोली तालुका कुंभार समाज, श्री संत गोरा कुंभार हितवर्धक मंडळ, दापोली यांच्या वतीने आयोजित विद्यार्थी गुणगौरव सोहळा २०२६ रविवार, दि. ४ ऑक्टोबर रोजी जळगाव, दापोली येथील प्रीती वर्धन सभागृहात उत्साहपूर्ण व मंगलमय वातावरणात संपन्न झाला. दापोली तालुक्यातील इयत्ता दहावी, बारावी, पदवी व पदव्युत्तर परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केलेल्या ८० गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.कार्यक्रमाची सुरुवात सुश्राव्य संगीतमय वातावरणात झाली. विद्यार्थ्यांच्या यशाचे कौतुक करताना मान्यवरांनी शिक्षणासोबतच सामाजिक बांधिलकी, संस्कार, ध्येयवेड आणि समाजासाठी योगदान देण्याचे आवाहन केले.या वर्षीच्या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे श्री संत गोरा कुंभार हितवर्धक मंडळाच्या वतीने प्रथमच समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींना विशेष पुरस्कार प्रदान करण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

समाजरत्न पुरस्कार (मरणोत्तर) कै. लक्ष्मण पांडुरंग आंजर्लेकर (गुरुजी) यांना शैक्षणिक, सामाजिक आणि कला क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल प्रदान करण्यात आला. हरणे हायस्कूलमध्ये मुख्याध्यापक म्हणून त्यांनी प्रदीर्घकाळ सेवा बजावली. तसेच कला क्षेत्रात उत्कृष्ट चित्रकार म्हणून त्यांनी वेगळी ओळख निर्माण केली. दापोली-खेड-मंडणगड तालुका कुंभार समाजाच्या संघटनात्मक कार्यातही त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान होते.समाजभूषण पुरस्कार डॉ. दिलीप सहदेव तळदेवकर यांना वैद्यकीय सेवेसोबतच सामाजिक बांधिलकी, मानवतावादी दृष्टिकोन आणि समाजहितासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल प्रदान करण्यात आला. दापोली तालुका कुंभार समाज हितवर्धक मंडळाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी दीर्घकाळ कार्य केले असून दापोली-खेड-मंडणगड तालुक्यांच्या समाज संघटनात्मक कार्यातही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.समाज गौरव आध्यात्मिक सेवा पुरस्कार ह. भ. प. प्रकाश महाराज पडवेकर यांना आध्यात्मिक, सामाजिक व जनजागृतीच्या कार्यातील योगदानाबद्दल प्रदान करण्यात आला. सन २०२१ पासून त्यांनी कालनगर ते पंढरपूर पायी दिंडीची सुरुवात करून वारकरी परंपरा व आध्यात्मिक चळवळीला चालना दिली. व्यसनमुक्तीच्या क्षेत्रातही त्यांचे उल्लेखनीय कार्य सुरू आहे. त्यांच्या सामाजिक व आध्यात्मिक कार्याची दखल घेत विविध पुरस्कारांनी त्यांचा गौरव करण्यात आला आहे.

टाइम्स स्पेशल

या पुरस्कारांमुळे समाजातील शैक्षणिक, सामाजिक, कला, वैद्यकीय आणि आध्यात्मिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्याची नवी प्रेरणादायी परंपरा मंडळाने सुरू केली आहे.कार्यक्रमास रत्नागिरी जिल्हा कुंभार समाजाचे अध्यक्ष श्री. सुभाष शेठ गुडेकर, जिल्हा परिषद सदस्य उमरळी गट, चिपळूण श्री. प्रमोद सुरेश निवळकर, प्रमुख वक्ते तथा राष्ट्रीय स्तरावरील प्रोफेशनल व कॉर्पोरेट ट्रेनर प्रा. कुणाल मंडलिक, श्री संत गोरा कुंभार युवा प्रतिष्ठान रत्नागिरी जिल्हाध्यक्ष श्री. महेश पडवेकर, जिल्हा संघटक श्री. जनार्दन मालवणकर, कोकण युवा प्रतिष्ठान अध्यक्ष श्री. मिलिंद दाभोळकर, कोकण विभागाचे माजी युवा कार्याध्यक्ष श्री. संकेत जालगावकर आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी दापोली तालुका मंडळाचे अध्यक्ष श्री. मिलिंद शेठ इवलेकर, सचिव श्री. प्रमोद मारुती निवळकर, खजिनदार श्री. संतोष खेडकर, उपखजिनदार श्री. प्रकाश गुंडेकर, माजी सचिव श्री. दीपक परबळकर, माजी उपसचिव श्री. श्याम लांजेकर, सोशल मीडिया अध्यक्ष श्री. महेश लांजेकर तसेच मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. प्रमोद मारुती निवळकर यांनी प्रभावीपणे केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी देणगीदार, विद्यार्थी, पालक, शिक्षक, समाजबांधव आणि स्वयंसेवक यांनी दिलेल्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त करण्यात आले. श्री. महेश लांजेकर यांनी आभार प्रदर्शन केले.गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान आणि समाजातील कर्तृत्ववान व्यक्तींचा गौरव अशा दुहेरी उद्देशाने आयोजित करण्यात आलेला हा सोहळा समाजाच्या एकजुटीचे, शैक्षणिक प्रगतीचे आणि सामाजिक बांधिलकीचे प्रेरणादायी उदाहरण ठरला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg