loader
Breaking News
Breaking News
Foto

रायपाटण केंद्रशाळेचा बाल आनंद मेळावा उत्साहात संपन्न!!

पाचल (सुरेश गुडेकर) - रायपाटण केंद्रशाळेचा बाल आनंद मेळावा विठ्ठल रुक्मिणी मंदिर येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यामध्ये सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनी आनंदाने सहभागी झाले होते. कार्यक्रमाचे उद्घाटन दीपप्रज्वलन करून करण्यात आले. प्रास्ताविक अश्विनी रविंद्र माने यांनी केले. यावेळी गजानन पळसुलेदेसाई, किशोर शिनगारे, माधुरी कुलकर्णी यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मेळाव्यामध्ये विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा, फनी गेम्स व गायन स्पर्धा घेण्यात आल्या. विद्यार्थ्यांनी या सर्व स्पर्धांमध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला. अश्विनी रविंद्र माने व विद्यार्थ्यांनी सुमधूर आवाजात भक्तीगीतांचे गायन करून उपस्थितांची मने जिंकली. मंदिराच्या ट्रस्टींच्या मार्फत विद्यार्थ्यांना बक्षिसे व खाऊ देण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अश्विनी माने व गजानन पळसुलेदेसाई यांनी केले. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि उत्साह यामुळे संपूर्ण कार्यक्रम बालमय वातावरणात पार पडला.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg