loader
Breaking News
Breaking News
Foto

शिक्षणमंत्री दादा भुसे यांची दामले विद्यालयाला भेट

रत्नागिरी : महाराष्ट्र राज्याचे शिक्षणमंत्री नामदार दादा भुसे यांनी आज सकाळी साडेसात वाजता रत्नागिरी शहरातील नामांकित दामले विद्यालयाला अचानक भेट देत शाळेच्या शैक्षणिक व प्रशासकीय कामकाजाची पाहणी केली. या भेटीदरम्यान शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी शाळेच्या नियमित परिपाठामध्ये सहभाग घेतला. विविध परीक्षा तसेच स्पर्धांमध्ये उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा तसेच शिक्षकांचा त्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी त्यांनी शाळेतील विविध उपक्रम, शैक्षणिक कामकाज आणि एकूण व्यवस्थेची पाहणी करून मुख्याध्यापक, शिक्षकवृंद आणि शाळा व्यवस्थापन समितीच्या कार्याचे कौतुक केले. आपल्या मनोगतात शिक्षणमंत्री दादा भुसे म्हणाले, “नगरपरिषद शाळा क्रमांक १५ अर्थात दामले विद्यालयाचा चढता आलेख आणि १,६४५ विद्यार्थ्यांची पटसंख्या ही अत्यंत उल्लेखनीय बाब आहे. संपूर्ण महाराष्ट्राने या शाळेचा आदर्श घ्यावा, अशी ही शाळा आहे. अशा शाळेला भेट देताना मला विशेष आनंद होत आहे. रत्नागिरीसारख्या शहरात इतर शाळांनी आदर्श घ्यावा, अशी शाळा उभी राहिली आहे.

टाईम्स स्पेशल

यावेळी जिल्हा परिषद शिक्षण सभापती मूरकर, माध्यमिक व प्राथमिक शिक्षणाधिकारी, नगरपरिषद शिक्षण विभागाचे मुरकुटे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मिलिंद संसारे तसेच विविध अधिकारी, कर्मचारी, शिक्षक आणि मान्यवर उपस्थित होते. शिक्षणमंत्र्यांच्या या अनपेक्षित भेटीमुळे दामले विद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक आणि शाळा व्यवस्थापनामध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. शाळेच्या शैक्षणिक प्रगतीची आणि वाढत्या विद्यार्थी पटसंख्येची राज्याच्या शिक्षणमंत्र्यांनी घेतलेली दखल ही विद्यालयासाठी निश्चितच अभिमानाची बाब ठरली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg