loader
Breaking News
Breaking News
Foto

ऍड. डॉ. रमेश कांबळे यांची महाराष्ट्र राज्य शाखेच्या अध्यक्षपदी निवड

केळंबे-लांजा (सिराज नेवरेकर) - प. पू. बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया (भारतीय बौद्ध महासभा) या संस्थेच्या महाराष्ट्र राज्य शाखेच्या अध्यक्ष पदी ऍड. डॉ. रमेश कांबळे यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली आहे. धम्मदिप बुद्ध विहार कल्याण (पूर्व) जिल्हा ठाणे याठिकाणी महाराष्ट्र राज्य शाखेच्या कार्यकारीणीच्या निवडीची मिटींग १७ ऑगस्ट रोजी पार पडली. यावेळी महाराष्ट्र राज्य शाखेच्या कार्यकारीणीची निवड संस्थेचे प्रमुख, रिपोर्टेड ट्रस्टी आणि राष्ट्रीय महासचिव तसेच इंटरेस्टेड पर्सेंन अँड बेनिफिशरी व्ही.एस. मोखळे तसेच संस्थेचे राष्ट्रीय कोषाध्यक्ष नाथा दाजी खैरमोडे यांच्या प्रमुख उपस्थित पार पडली. सदर बैठकीत महाराष्ट्र राज्य शाखेच्या अध्यक्षपदी रमेश विठ्ठल कांबळे जि. रत्नागिरी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

ऍड. डॉ. रमेश कांबळे यांनी संस्थेसाठी दिलेले योगदान, सामाजिक कार्य, संघटन कौशल्य, प्रवचनकारक, श्रामणेर, बौद्धाचार्य, संस्थेवरील प्रेम, न्यायालयीन काम, संघटन कौशल्य आणि समाजाप्रती असलेला आदर इत्यादी कामांचा अनुभव विचारात घेता त्यांची राज्य शाखेच्या अध्यक्षपदी निवड घोषित करण्यात आली आहे. त्याबद्दल त्यांचेवर सर्व जिल्ह्यातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg