केळंबृ-लांजा (सिराज नेवरेकर) - राज्य विज्ञान शिक्षण संस्था, रविनगर नागपूर, माध्यमिक शिक्षण विभाग, रत्नागिरी आणि रत्नागिरी जिल्हा विज्ञान मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय विज्ञान नाट्योत्सव २०२६ ही जिल्हास्तरीय स्पर्धा पटवर्धन हायस्कूल रत्नागिरी येथे पार पडली. असून प्रशालेच्या सुयशामुळे विभागस्तरीय स्पर्धेसाठी पेडणेकर विद्यालय तळवडे रत्नागिरी जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहे. प्रशालेने सादर केलेल्या 'ॲस्ट्रिया - द लास्ट होप' या नाटिकेने प्रेक्षकांना एका जागृत विचाराने अंतर्मुख केले. अंतराळातील वस्तीपर्यंतच्या मानवाच्या प्रवासाची चित्तथरारक, संघर्षमयी कहाणी प्रभावीपणे रंगमंचावर सादर करण्यात आली.
'ॲस्ट्रिया - द लास्ट होप' ही कथा भविष्यातील एका धोकादायक वास्तवावर आधारित आहे. ग्लोबल वॉर्मिंग ने पिळवटलेली पृथ्वी, वाढती नैसर्गिक आपत्ती, आणि माणसाची शेवटची आशा म्हणून अंतराळात नव्या वसाहतीचा शोध घेतला गेला आहे. नाटिका प्रभावीपणे, अचूक बारकाव्यांसह सादर होण्यासाठी नाटिकेचे लेखक भूषण बागुल यांनी उत्तम दिग्दर्शन केले. तसेच सह दिग्दर्शन श्रीनायक घगवे, गणेश झोरे, विवेक किल्लेदार यांनी केले. मुलांकडून आत्मविश्वासंपूर्ण अचूक टायमिंगनिशी तयारी करवून घेतली. यामधे तेजस सावंत, श्रेयस चव्हाण, हिमांशु पाटोळे, ज्ञानेश्वरी शिंदे, आराध्या भिंगारे, श्रवण कांबळे, मेघना पोवार यांनी उत्तम अभिनय केला. पार्श्वसंगीत प्रदीप कांबळे यांनी दिले. रंगभूषा गजानन पांचाळ यांनी केली. वेशभूषा व नेपथ्य अक्षता सावंत, शुभम पाटोळे यांनी केले. ध्वनी संयोजन व प्रकाश योजना संदेश हतपले, नयन सांडीम यांनी केले.
नाटिका सादर करण्यासाठी मुख्याध्यापक प्रकाश हर्चेकर, विज्ञान विभाग प्रमुख स्वरा वासुरकर, नेहा पाटोळे, श्वेता सावंत, अविनाश चव्हाण, जनार्दन पाटोळे, अंश कांबळे, योगेश पितळे, नंदू कांबळे,शुभम भितळे, आकाश भितळे निनाद माने,सोहम नामये,यश गुरव, श्रीराम लांजेकर यांनी महत्वपूर्ण सहकार्य केले. विशेष मेहनत घेतली. प्रशालेच्या यशाबद्दल तळवडे शिक्षणोत्तेजक संस्था मुंबईचे अध्यक्ष डॉ. आनंद पेडणेकर, उपाध्यक्ष ॲड. रमेश कदम, कार्यवाह मनोहर पाटोळे, स्थानिक संस्थेचे अध्यक्ष दिगंबर पाटोळे, उपाध्यक्ष संजय पाटोळे, कार्यवाह मनोहर पाटोळे, सहकार्यवाह नंदकुमार आंबेकर, शाळा समिती चेअरमन कॅ. नामदेव पाटोळे, सदस्य विजय पाटोळे, व्यवस्थापन समिती अध्यक्ष अनंत लांजेकर तसेच मुंबई संस्था, स्थानिक संस्था, शाळा समिती पदाधिकारी व सदस्य यांनी यशस्वी कलाकार, मार्गदर्शक व पालकांचे अभिनंदन केले व पुढील विभागस्तर सादरीकरणासाठी शभेच्छा दिल्या.











































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)
























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)


































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.