loader
Breaking News
Breaking News
Foto

गुहागर मधील अपक्ष नगरसेविकेचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश

वेळणेश्वर (उमेश शिंदे) - खासदार सुनील तटकरे यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या विकास कामांच्या कार्यपद्धतीवर प्रभावित होऊन गुहागर शहरातील महाविकास आघाडीच्या विद्यमान नगरसेविका कोमलताई जांगळी यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यावेळी त्यांच्यासोबत त्यांच्या प्रभागातील दर्शन जागळी, विक्रांत सांगळे, ओंकार सांगळे, कल्पेश जांगळी, मनोहर जांगळी, युवकांचा तसेच कीर्तनवाडी येथील स्वप्निल मुकनाक, संदीप फटकरे, महेंद्र जोशी आदी युवकांनी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी गुहागर मधील विविध विकास कामांवर चर्चा झाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख पदाधिकारी खासदार सुनील तटकरे, जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव, जिल्हा परिषद सदस्य अजय बिरवटकर, महिला जिल्हाध्यक्षा साधनाताई बोत्रे, रमा बेलोसे, जयंत जळगावकर, तालुकाध्यक्ष साहिल आरेकर, शहराध्यक्ष मंदार कचरेकर, नगरसेवक सौरभ भागडे, युवक अध्यक्ष संदेश भागडे, सेक्रेटरी संतोष जोशी, जिल्हा उपाध्यक्ष श्रीधर बागकर, कार्याध्यक्ष माधव साटले, आर्यन वराडकर, दीपक शीरधनकर, वेदांत पडवळ तसेच कार्यकर्ते उपस्थितीत होते.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg