loader
Breaking News
Breaking News
Foto

‘सुपर गोल्ड’ प्रमाणपत्र सन्मानित साधना भांडे यांचा भंडारी समाजाच्यावतीने गौरव

देवगड(प्रतिनिधी)- अंगणवाडीच्या मुलांना घडविताना आपल्यातील कौशल्याच्या बळावर साधना भुपेन्द्र भांडे यांनी राबविलेल्या उपक्रमांची दखल महाराष्ट्र शासन २०२५ उपक्रमांतर्गत सुपर गोल्ड’ प्रमाणपत्राने त्यांना सन्मानित करण्यात आले. ही मिठबाव शेगुलवाडासाठी अभिमानाची आणि कौतुकाची बाब आहे असे शेगुलवाडा शाळेच्या मुख्याध्यापिका भक्ती भालचंद्र चव्हाण यांनी मिठबाव शेगुलवाडा समाज मुंबईच्यावतीने आयोजित शाळेच्या सभागृहात केलेल्या अध्यक्षीय भाषणात बोलताना प्रतिपादन केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

प्रारंभी मुंबई संस्थेचे खजिनदार रमेश भगवान वाडेकर यांनी संस्थेच्या कार्याची आढावा घेतला. मुख्याध्यापिका भक्ती चव्हाण म्हणाल्या की, साधना भांडे यांची कामाप्रती तळमळ निष्ठा आणि प्रामाणिकपणा त्याहीपेक्षा झोकून देऊन काम करण्याची पद्धत भावते. त्यांच्या हातून अधिक जोमाने कार्य सुरू राहो अशी इच्छा सदिच्छा व्यक्त करते. याप्रसंगी सहशिक्षक रामनाथ गोसावी, अशोक मुणगेकर यांनी बाईच्या कार्याबद्दल गौरवोद्गार काढले. यावेळी साधना भांडे यांना शाल, श्रीफळ, प्रमाणपत्र, पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.

टाइम्स स्पेशल

सत्काराला दाखल साधना भांडे यांनी आपण सर्व समाज बांधवांनी दिलेल्या सहकार्यामुळे माझ्याकडून कार्य घडू शकले अशा शब्दात कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी सर्वश्री जगदिश दहिबावकर, चंद्रकांत मुणगेकर, शैलेंद्र दहिबावकर, सुमित कांबळी मुंबई पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg