loader
Breaking News
Breaking News
Foto

सेवानिवृत्त दिव्यांग शिक्षकाचे स्वग्रामी बील दोन वर्षांपासून प्रलंबित, जिल्हा परिषदेकडे ते मागताहेत न्याय

चिपळूण : सेवानिवृत्त शिक्षक एजाज महमूद इब्जी यांचे स्वग्रामी बिल रु. ३६,१२०/- गेली दोन वर्षे प्रलंबित आहे. ते दि. ३० नोव्हेंबर २०२४ रोजी सेवानिवृत्त झाले. मात्र आजपर्यंत त्यांना त्यांच्या हक्काची रक्कम मिळालेली नाही. दि. १ एप्रिल २०२५ रोजी पंचायत समिती चिपळूणने लेखी कळविले की, जिल्हा व तालुका स्तरावर अनुदान जमा झाले नसल्याने बिल खर्ची टाकता आले नाही. अनुदान आल्यावर बिल देण्यात येईल. या आश्वासनावर इब्जी यांनी १९ महिने वाट पाहिली. दोन वेळा पेन्शन अदालती मध्ये मुद्दा मांडला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

दि. २ नोव्हेंबर २०२६ च्या पेन्शन अदालतमध्ये मुद्दा मांडल्यावर दि. ३ नोव्हेंबर २०२६ रोजी नवीन पत्र आले. त्यात म्हटले आहे की, स्वग्रामी नोंद पडताळणीसाठी सेवापुस्तक मागवले आहे व जिल्हा परिषद रत्नागिरीकडून मार्गदर्शन मागवले आहे. यावर इब्जी यांचा मार्मिक सवाल आहे, माझे सेवापुस्तक तर चिपळूण कार्यालयातच होते. तेव्हा खात्री का केली नाही? २०२५ मध्ये फक्त निधीचा प्रश्न होता, तर २०२६ मध्ये अचानक सेवापुस्तकाचा प्रश्न कसा आला? ही फसवणूक नाही तर काय?

टाईम्स स्पेशल

वृद्धापकाळात औषध-पाण्यासाठी ही रक्कम गरजेची असताना प्रशासन टोलवाटोलवी करत असल्याचा आरोप एजाज इब्जी यांनी केला आहे. त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. रत्नागिरी यांच्याकडे तात्काळ बिल अदा करण्याची व विलंबाची चौकशी करण्याची मागणी केली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg