loader
Breaking News
Breaking News
Foto

दसऱ्यानंतर कणकवलीच्या गावऱ्हाटी देवतांचे सीमोल्लंघन, ढोल-ताशांच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतषबाजीत देवतांचे स्वागत

कणकवली (प्रतिनिधी) - दसऱ्यानंतर गुरुवारी सकाळी कणकवलीचे ग्रामदैवत श्री देव स्वयंभू रवळनाथ यांच्या गावऱ्हाटी देवतांनी पारंपरिक पद्धतीने सीमोल्लंघन केले. गावाच्या चतुःसीमांना भेटी देण्याच्या या धार्मिक सोहळ्यात मानकरी, वस, गावपुरुष आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. श्री देव स्वयंभू रवळनाथ मंदिरातून सीमोल्लंघनासाठी निघालेल्या देवतरंग व पालखीचे पटकिदेवी परिसरातून ढालकाठी बाजारपेठेत आगमन झाले. यावेळी ढोल-ताशांचा गजर आणि फटाक्यांच्या आतषबाजीने परिसर दुमदुमून गेला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

बाजारपेठेतील रस्त्याच्या दुतर्फा आकर्षक रांगोळ्या काढून देवतांचे स्वागत करण्यात आले. व्यापारी, नागरिक आणि भाविकांनी देवतरंग तसेच पालखीचे पूजन करून दर्शन घेतले. देवतरंग वाहून नेणाऱ्या वसांच्या पायांवर पाणी घालून त्यांचेही पूजन करण्यात आले.यानंतर झेंडा चौक येथील नांदरूकी येथे देवतांचे विधिवत पूजन करण्यात आले. तेथून देवतांचा पुढील प्रवास सुरू झाला. कणकवली पोलीस ठाण्यासमोरील महापुरुष मंदिरातून गाडादेवी व माऊली देवस्थान येथे भेटी देत रेल्वे स्टेशन रोडमार्गे देवतांना पुन्हा त्यांच्या मूळ स्थानी आणण्यात आले. परंपरा, श्रद्धा आणि ग्रामदैवतांप्रती असलेली निष्ठा यांचा संगम असलेल्या या सीमोल्लंघन सोहळ्यामुळे कणकवलीतील धार्मिक आणि सांस्कृतिक वातावरण भक्तिमय झाले होते.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg