loader
Breaking News
Breaking News
Foto

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दिल्ली येथील सभेचे खेडमध्ये मोठ्या पडद्यावर थेट प्रक्षेपण; भाजपा पदाधिकारी, कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती

खेड (प्रतिनिधी) : भारताचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या २५ वर्षांच्या अविरत आणि अखंड जनसेवेच्या गौरवशाली प्रवासानिमित्त गणेश कृपा मंगल कार्यालय, खेड येथे ‘विकसित भारत संकल्प सभा’ मोठ्या उत्साहात संपन्न झाली. यावेळी दिल्ली येथून पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या सभेचे थेट प्रक्षेपण मोठ्या पडद्यावर (ङएॄ स्क्रीन) करण्यात आले होते. देशाच्या विकासाची दिशा, राष्ट्रनिर्माणाचा संकल्प, आत्मनिर्भर भारत आणि आगामी काळातील भारताचे जागतिक सामर्थ्य याबाबत पंतप्रधानजींनी मांडलेले विचार ऐकण्यासाठी खेड तालुक्यातील भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. या कार्यक्रमाला भाजपा आमदार प्रमोद जठार, भाजपा नेते तथा खेड नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष अ‍ॅड. वैभव खेडेकर, भाजपा उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सतीश मोरे, भाजपा रत्नागिरी जिल्हा महामंत्री तथा गुहागर पंचायत समितीचे उपसभापती निलेश सुर्वे, खेड पंचायत समितीचे माजी सभापती विजयराव कदम, भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश सचिव अ‍ॅड. मिलिंद उर्फ दादू नांदगांवकर, भाजपा उत्तर रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस वसंत ताम्हणकर, भाजपा कोकण पदवीधर प्रकोष्ठ कोअर कमिटी सहसंयोजक अजय दळवी, भाजपा उत्तर रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्ष संजय आखाडे, भाजपा खेड उत्तर तालुकाध्यक्ष ऋषिकेश मोरे, भाजपा दक्षिण खेड तालुकाध्यक्ष विनोद चाळके, भाजपा खेड शहराध्यक्ष भालचंद्र उर्फ नंदू साळवी उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यांच्यासह नगरसेविका वैभवी वैभव खेडेकर, दापोली नगरपंचायतीच्या नगरसेविका तथा महिला तालुका अध्यक्षा जया साळवी, माजी नगराध्यक्ष तथा महिला मोर्चा खेड तालुकाध्यक्ष उर्मिला शेट्ये-पाटणे, माजी नगरसेविका तथा महिला मोर्चा शहराध्यक्षा आशा सनगरे, महिला मोर्चा शहर चिटणीस सौ. ममता दांडेकर, संजीवनी शेलार, आर्या कारेकर, भाजपा ट्रान्सपोर्ट सेल उपजिल्हाध्यक्ष निलेश बामणे, ओबीसी मोर्चा उपाध्यक्ष तथा माजी नगरसेवक संदेश भुवड, ट्रान्सपोर्ट सेल तालुकाध्यक्ष सुयश खेडेकर, रिक्षा युनिट उपतालुकाध्यक्ष तुषार पवार, जिल्हा कार्यकारणी सदस्य अजय तोडकरी, विनायक शिरगावकर, शक्तीकेंद्र प्रमुख वैजेश सागवेकर, किसान मोर्चा सरचिटणीस धीरज पटेल, तालुका सरचिटणीस शुभम गायकवाड, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष विशाल होळकर, युवा मोर्चा उपाध्यक्ष अविराज मोरे, युवा मोर्चा शहराध्यक्ष स्वराज गांधी, बूथ अध्यक्ष दत्तात्रय मोरे, शहर सरचिटणीस विजय गुप्ता, शहर चिटणीस अनिकेत पवार, सोशल मीडिया प्रमुख सर्वेश पवार, बाळू वर्मा, राहुल प्रभू, प्रदीप भोसले यांच्यासह भाजपा पक्षातील प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या २५ वर्षांच्या जनसेवेचा प्रवास हा प्रत्येक कार्यकर्त्यासाठी प्रेरणादायी असून ‘विकसित भारत २०४७’ चा संकल्प पूर्ण करण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने कटिबद्ध होण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg