loader
Breaking News
Breaking News
Foto

लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा ‘शरदरत्न जीवनगौरव पुरस्काराने’ सन्मान

पनवेल :- गोरगरिबांचे आधारस्तंभ, गरजूंच्या मदतीला धावून जाणारे दानशूर व्यक्तिमत्त्व, समाजाच्या सुख-दुःखात सहजपणे सहभागी होणारे आणि कोणताही अभिनिवेश न ठेवता सर्वसामान्यांमध्ये मिसळून राहणारे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या सहा दशकांहून अधिक काळाच्या संघर्षमय, कर्तृत्ववान आणि सेवाभावी जीवनप्रवासाचा प्रतिष्ठेच्या ‘शरदरत्न जीवनगौरव पुरस्काराने’ गौरव करण्यात आला. समाजसेवा, शिक्षण, क्रीडा, कला, संस्कृती, रोजगार आणि सार्वजनिक जीवनात त्यांनी दिलेल्या उल्लेखनीय योगदानाची दखल घेत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. शरद प्रतिभाशाली सांस्कृतिक प्रतिष्ठान, महाराष्ट्र यांच्या वतीने मुंबईतील रवींद्र नाट्यमंदिर येथे दि. ७ रोजी आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यात रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, माजी केंद्रीय मंत्री तथा खासदार शरद पवार यांच्या हस्ते आणि प्रतिभाताई पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच राज्यातून आलेल्या हजारो नागरिकांच्या उपस्थितीत लोकनेते रामशेठ ठाकूर यांना हा सन्मान समारंभपूर्वक प्रदान करण्यात आला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या सोहळ्यास रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी, ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे, माजी नगराध्यक्ष जे.एम. म्हात्रे, ज्येष्ठ नेते वाय. टी देशमुख, भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, महापौर नितीन पाटील, कामगार नेते महेंद्र घरत, यांच्यासह पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते व विद्यमान नगरसेवक परेश ठाकूर, वर्षा प्रशांत ठाकूर, अर्चना परेश ठाकूर, अमोघ ठाकूर, पूनम ठाकूर, रत्नप्रभा घरतयांच्यासह ठाकूर कुटुंबीय, माजी नगरसेवक अनिल भगत, माजी शहराध्यक्ष जयंत पगडे, शरद प्रतिभाशाली सांस्कृतिक प्रतिष्ठानचेअध्यक्ष राजारामबुवाशेलार, उपाध्यक्ष भावना घाणेकर, विविध संस्थांचे पदाधिकारी यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg