loader
Breaking News
Breaking News
Foto

वन्यजीवांचे रक्षण म्हणजेच पर्यावरणाचे संरक्षण - चेतन पाटील

पोईप (वार्ताहर) - मालवण तालुक्यातील काळसे येथील श्री शिवाजी विद्यामंदिर आणि जयश्री वामन प्रभु कला व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय येथे वन्यजीव सप्ताहनिमित्त विद्यार्थ्यांसह निसर्ग भ्रमंती करण्यात आली. यावेळी कुडाळ वनक्षेत्रपाल चेतन पाटील यांनी मार्गदर्शन करत वन्यजीव हे निसर्गाचा महत्वाचा भाग असून निसर्गचक्रात त्यांचे त्यांची भूमिका महत्वापूर्ण आहे त्यामुळे वन्यजीवांचे रक्षण म्हणजेच पर्यावरणाचे संरक्षण होय, असे सांगितले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या भ्रमंती दरम्यान धामापुर तलाव व परिसरातील पक्षी, जैवविविधता, वन्यजीव याबाबत सदानंद परब, वनपाल मालवण व महंमद शेख, सम्यंतक संस्था सदस्य यानी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमासाठी अतुल खोत वनरक्षक धामापुर, लक्ष्मण आम्ले वनरक्षक कांदळगाव, प्रशालेचे मुख्याध्यापक परब, विद्यार्थी, सम्यंतक संस्था सदस्य, इतर शिक्षक, कर्मचारी, RRT पथक मालवण व कुडाळ चे सदस्य उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg