loader
Breaking News
Breaking News
Foto

श्रीराम विद्यालयात जिल्हास्तरीय कथाकथन स्पर्धा उत्साहात संपन्न

केळंबे-लांजा (सिराज नेवरेकर) - वेरवली पंचक्रोशी शिक्षण मंडळ संचलित श्रीराम विद्यालय तुकाराम पुंडलिक शेटे कनिष्ठ महाविद्यालय व का.रा कोळवणकर यामाहा ट्रेनिंग स्कूल वेरवली बुद्रुकमध्ये जिल्हास्तरीय कथाकथन स्पर्धा उत्साहात पार पडली. स्वर्गीय रमेश धोंडू डोळस स्मृती प्रित्यर्थ आयोजित ही स्पर्धा एकूण प्राथमिक, माध्यमिक, महाविद्यालयीन आणि खुला अशा चार गटांमध्ये पार पडली. प्राथमिक गटामध्ये प्रथम क्रमांक शर्वरी दत्तात्रय पांचाळ, द्वितीय क्रमांक ओम उदय यादव, तृतीय क्रमांक रुंजी मिलिंद गोखले तसेच उत्तेजनार्थ मुग्धा संजय आंब्रे, सहेर सुलेमान डबीर, संस्कृती विजय मोहिते यांनी यश संपादन केले, तर या गटामध्ये विशेष जज पुरस्कार विद्यालयाची विद्यार्थिनी सिद्धी मौसमकर हिने पटकावला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

माध्यमिक गटामध्ये प्रथम क्रमांक आर्या उदय यादव, द्वितीय क्रमांक ऋतुजा रवींद्र मिरजोळकर, तृतीय क्रमांक देवता प्रमोद पाटील, उत्तेजनार्थ आरोही श्रीकांत फडतरे, स्वरा धर्मेंद्र पवार व असमी महेंद्र जाधव यांनी बाजी मारली. या गटात विद्यालयाची विद्यार्थिनी समृद्धी दिगंबर साळसकर हिने विशेष जज पुरस्कार पटकावला. महाविद्यालयीन गटात प्रथम क्रमांक सोनाली मंगेश कदम, द्वितीय क्रमांक अनुष्का उदय मांजरे, व तृतीय क्रमांक श्रुती विजय मांडवकर हिने पटकावला. खुल्या गटामध्ये प्रथम क्रमांक जयंत गोपाळ फडके, द्वितीय क्रमांक सुजाता श्रीपाल कोकणे, व तृतीय क्रमांक अश्विनी युवराज करोसे यांनी पटकावला. चारही गटातील विजेत्यांना सन्मानचिन्ह सन्मानपत्र व रोख रक्कम देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg