loader
Breaking News
Breaking News
Foto

राष्ट्रीय हिंदी परीक्षेत वराडकर हायस्कूल कट्टाचे सुयश

मालवण (प्रतिनिधी) - महात्मा गांधी राजभाषा हिंदी प्रचार संस्था तर्फे अखिल भारतीय राजभाषा हिंदी ओलंपियाड परीक्षेत मधुर अर्जुन पेंडुरकर व ऋतुजा सुहास परब या विद्यार्थ्यांनी महात्मा गांधी राजभाषा हिंदी प्रतिभा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. प्रमाणपत्र सन्मानचिन्ह व मेडल असे सन्मानाचे स्वरूप असून प्रशालेतील एकूण शंभर विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. सहभागी विद्यार्थ्यांनाही प्रमाणपत्र व मेडल यांनी सन्मानित करण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

याबरोबरच वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय संयुक्त कट्टा या प्रशालेस आदर्श प्रशाला, देवयानी धनंजय गावडे यांना आदर्श मुख्याध्यापिका, तसेच बाळकृष्ण मल्लाप्पा वाजंत्री यांना परीक्षा आयोजक त्याचप्रमाणे आदर्श हिंदी अध्यापक म्हणून सिमरन समीर चांदरकर, भूषण विकास गावडे, रितेश तुकाराम जांभवडेकर यांना प्रमाणपत्र सन्मानचिन्ह व मेडल देऊन सन्मानित करण्यात आले. या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष अजयराज वराडकर, संस्था पदाधिकारी, मुख्याध्यापिका देवयानी गावडे, पर्यवेक्षक महेश भाट, सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg