loader
Breaking News
Breaking News
Foto

रोटरी इंग्लिश मीडियम स्कूलच्या पूर्वा सुतारची सीए फाउंडेशन परीक्षेत दिमाखदार यशस्वी भरारी!

खेड (प्रतिनिधी) - यशाला कष्टांची जोड, जिद्दीला सातत्याची साथ आणि ध्येयाप्रती प्रामाणिक प्रयत्नांची प्रेरणा मिळाली की यशाचे शिखर गाठता येते, हे रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल, खेडची विद्यार्थिनी पूर्वा गणेश सुतार हिने आपल्या उल्लेखनीय यशातून सिद्ध करून दाखवले आहे. इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (ICAI) यांच्या वतीने सप्टेंबर २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या प्रतिष्ठेच्या सीए फाउंडेशन परीक्षेत पूर्वाने २१८ गुण मिळवून यशस्वीरीत्या उत्तीर्ण होण्याचा मान मिळवला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सीए अर्थात चार्टर्ड अकाउंटंट होण्याच्या दिशेने पूर्वाने टाकलेले हे पहिले महत्त्वपूर्ण पाऊल असून तिच्या या यशामागे मेहनत, जिद्द, आत्मविश्वास आणि अभ्यासातील सातत्य यांचा मोलाचा वाटा आहे. योग्य नियोजन, नियमित सराव आणि ध्येय साध्य करण्याची चिकाटी यांमुळे तिने हे यश संपादन केले आहे. तिच्या या यशस्वी वाटचालीत रोटरी स्कूलच्या वाणिज्य शाखेतील सर्व शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.

टाईम्स स्पेशल

पूर्वाच्या या यशामुळे रोटरी इंग्लिश मीडियम स्कूलच्या शैक्षणिक गुणवत्तेचा आणि विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या दर्जेदार मार्गदर्शनाचा गौरव झाला आहे. तिच्या यशाने शाळेच्या शिरपेचात मानाचा आणखी एक तुरा रोवला गेला असून इतर विद्यार्थ्यांसाठीही तिने प्रेरणादायी आदर्श निर्माण केला आहे. या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे चेअरमन डॉ. उपेंद्र तलाठी, संस्थेचे सर्व पदाधिकारी, शाळेच्या मुख्याध्यापिका भूमिता पटेल, शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी पूर्वाचे मनःपूर्वक अभिनंदन केले असून तिच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg