loader
Breaking News
Breaking News
Foto

छटपूजेसाठी तलावात उतरलेल्या २० वर्षीय तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू

ठाणे (प्रतिनिधी) - ठाण्यात जागोजागी छटपूजा सुरू होती. या पूजेच्या निमित्ताने कळव्यातील मफतलाल कंपाउंड येथे तलावात उतरलेल्या २० वर्षीय तरुणाला तलावाच्या पाण्याची खोलीचा अंदाज न आल्याने तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. सोमवारी १६ नोव्हेंबर रोजी सकाळी साडेसहाच्या सुमारास छटपूजेनिमित्त कळव्यातील मफतलाल कंपाऊंड परिसरात रेल्वे स्थानकाच्या बाजूला असलेल्या तलावात उतरलेल्या २० वर्षीय तरुणाचा पाण्याचा अंदाज न आल्याने बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

प्रदीप गुलाब विश्वकर्मा (वय २०, रा. यादव चाळ, भास्कर नगर, कळवा) असे मृत तरुणाचे नाव आहे. या घटनेची माहिती आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेला मिळाली. या घटनेची माहिती मिळताच कळवा पोलिस, अग्निशमन दलाचे जवान आणि ठाणे आपत्ती प्रतिसाद दलाचे (टीडीआरएफ) पथक घटनास्थळी दाखल झाले. तलावात शोधमोहीम राबविण्यात आली. अखेर अंडरवॉटर टेलिस्कोपिक कॅमेऱ्याच्या सहाय्याने सकाळी ७.१५ वाजण्याच्या सुमारास प्रदीप याचा मृतदेह तलावातून बाहेर काढण्यात जवानांना यश आले. त्यानंतर मृतदेह कळवा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला. पुढील कार्यवाहीसाठी तो छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात पाठविण्यात आला. या घटनेमुळे छटपूजेच्या उत्सवी वातावरणावर शोककळा पसरली.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg