loader
Breaking News
Breaking News
Foto

रोटरी स्कूलच्या माजी विद्यार्थ्यांची सीए परीक्षेत उल्लेखनीय कामगिरी!

खेड (प्रतिनिधी) - रोटरी प्रतिष्ठान संचलित रोटरी इंग्लिश मिडियम स्कूल, खेडच्या माजी विद्यार्थ्यांनी चार्टर्ड अकाउंटंट (CA) परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. आशय पाटणे, श्रेया बामणे आणि अनिकेत कुलकर्णी यांनी आपल्या मेहनतीच्या आणि जिद्दीच्या जोरावर यशाची नवी उंची गाठत शाळेचा नावलौकिक वाढविला आहे. आशय पाटणे याने सीए इंटरमिजिएट परीक्षेतील दोन्ही ग्रुप यशस्वीरीत्या उत्तीर्ण केले असून, तो आता सीए फायनल परीक्षेसाठी पात्र ठरला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

श्रेया बामणेने सीए इंटरमिजिएट परीक्षा उत्तीर्ण करून सीए फायनलसाठी पात्रता मिळवली आहे. तर अनिकेत कुलकर्णी याने सीए इंटरमिजिएट परीक्षेतील पहिला ग्रुप यशस्वीरीत्या उत्तीर्ण केला आहे. त्याच्या या यशामुळे सीए होण्याच्या दिशेने त्याने महत्त्वाचे पाऊल टाकले आहे. या तिन्ही विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या यशामुळे रोटरी इंग्लिश मिडियम स्कूल, खेडच्या शैक्षणिक गुणवत्तेची आणि विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या भक्कम शैक्षणिक पायाची पुन्हा एकदा प्रचिती आली आहे. विद्यार्थ्यांच्या या यशामागे त्यांची मेहनत, सातत्य, पालकांचे प्रोत्साहन आणि शिक्षकांचे मार्गदर्शन यांचा मोलाचा वाटा आहे.

टाईम्स स्पेशल

या यशस्वी विद्यार्थ्यांना वाणिज्य शाखेच्या प्रा. रूपाली बोडस, प्रा. ॲड. बाळासाहेब राऊत, प्रा. पारस नलावडे, प्रा. अक्सा पोफळणकर, प्रा. संतोष पाटील, प्रा. स्वप्नील पंडित यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल रोटरी स्कूलचे चेअरमन डॉ. उपेंद्र तलाठी, सर्व पदाधिकारी, शाळेच्या मुख्याध्यापिका भूमिता पटेल, शिक्षकवृंद आणि कर्मचारी यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg