loader
Breaking News
Breaking News
Foto

राज्यस्तरीय फुटबॉलपटू कनक पवार हिचा सत्कार

रत्नागिरी : सेंट थॉमस स्कूल, रत्नागिरीची गुणवंत फुटबॉलपटू कनक सचिन पवार हिने महाराष्ट्र राज्य फुटबॉल संघाचे प्रतिनिधित्व करून राष्ट्रीय स्तरावरील फुटबॉल स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल तिचा सत्कार समारंभ सेंट थॉमस स्कूलमध्ये आयोजित करण्यात आला. कनकची सलग तीन वर्षे राज्यस्तरीय बेस कॅम्पसाठी निवड झाली होती. मागील दोन वर्षांत तिला महाराष्ट्राच्या अंतिम संघात स्थान मिळू शकले नव्हते. मात्र, सातत्यपूर्ण सराव, मेहनत, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर यावर्षी तिने महाराष्ट्राच्या राज्य फुटबॉल संघात स्थान मिळविले. आंध्र प्रदेश येथे झालेल्या राष्ट्रीय स्तरावरील फुटबॉल स्पर्धेत तिने महाराष्ट्राच्या संघाकडून तीन सामने खेळले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

कनकच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल जिल्हा क्रीडा अधिकारी विजय शिंदे यांच्या हस्ते तिचा सत्कार करण्यात आला. यावेळी रत्नागिरी जिल्हा फुटबॉल संघटनेचे सचिव मोरे तसेच अध्यक्ष काका परांजपे उपस्थित होते. कार्यक्रमाला सांगली मिशन सोसायटीचे अध्यक्ष फादर टॉम, सेंट थॉमस स्कूलचे मॅनेजर रेव्ह. फादर मॅथ्यू आणि प्राचार्य रेव्ह. फादर जॉर्ज यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच रत्नागिरी जिल्हा हँडबॉल संघटनेचे अध्यक्ष प्रवीण आंबेकर आणि रत्नागिरी जिल्हा फुटबॉल संघटनेचे खानविलकर यांचीही उपस्थिती होती. कनकला गेल्या अनेक वर्षांपासून मार्गदर्शन, प्रशिक्षण व प्रोत्साहन देणारे तिचे क्रीडा शिक्षक अजित धावडे यांचाही यावेळी विशेष सत्कार करण्यात आला. कनकच्या क्रीडा प्रवासात त्यांनी दिलेल्या सातत्यपूर्ण मार्गदर्शनाचा महत्त्वपूर्ण वाटा आहे. या सत्कार सोहळ्याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे कनकच्या सर्व क्रीडा सहकाऱ्यांनी तिच्यासोबत व्यासपीठावर उपस्थित राहून तिच्या यशाचा आनंद साजरा केला. त्यामुळे हा सोहळा संपूर्ण शाळेसाठी अभिमानाचा आणि आनंदाचा क्षण ठरला.

टाईम्स स्पेशल

यावेळी कनकने आपल्या मनोगतात शाळेचे व्यवस्थापन, प्राचार्य, शिक्षक, मित्रमैत्रिणी तसेच आपल्या आई-वडिलांचे मनःपूर्वक आभार मानले. आपल्या क्रीडा प्रवासात मिळालेल्या सातत्यपूर्ण पाठिंब्याबद्दल, प्रोत्साहनाबद्दल आणि प्रत्येक टप्प्यावर दिलेल्या सहकार्याबद्दल तिने सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. राज्यस्तरीय बेस कॅम्पसाठी सलग तीन वर्षे निवड होऊन अखेर महाराष्ट्राच्या राज्य संघाचे प्रतिनिधित्व करण्यापर्यंतचा कनकचा प्रवास तिच्या मेहनत, जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वासाचे प्रतीक आहे. तिच्या या यशामुळे सेंट थॉमस स्कूल आणि रत्नागिरीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून, तिची कामगिरी युवा खेळाडूंसाठी प्रेरणादायी ठरली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg