loader
Breaking News
Breaking News
Foto

महिला पोलीस हवालदार स्मिता माने मृत्यूप्रकरणी पतीला दोन दिवसाची पोलीस कोठडी

कणकवली (प्रतिनिधी)- महिला पोलीस हवालदार स्मिता माने यांच्यामृत्यू प्रकरणात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २४८/२०२६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील मृत महिला आणि आरोपी हे पती-पत्नी आहेत. महिलेच्या आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून हा गुन्हा नोंदविण्यात आला असून, सचिन माने यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. कणकवली पोलीस ठाण्यातील महिला पोलीस हवालदार स्मिता सचिन माने यांचा मृतदेह झाडाला लटकलेल्या स्थितीत आढळला होता. याप्रकरणी स्मिता माने यांचे पती पोलीस कॉन्स्टेबल सचिन माने यांच्या विरोधात स्मिता माने यांची बहीण रेश्मा रवींद्र जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या गुन्ह्यात आरोपीला न्यायालयासमोर हजर करण्यात आले असून, तपासासाठी पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली आहे. गुन्ह्याच्या अनुषंगाने आवश्यक पुरावे व वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत. मृत महिलेचा विसेरा राखून ठेवण्यात आला असून, शवविच्छेदन अहवालातून अद्याप स्पष्ट निष्कर्ष प्राप्त झालेला नाही. या प्रकरणाचा सविस्तर अहवाल कोल्हापूर येथे इन-कॅमेरा पद्धतीने सादर करण्यात आला असून, तो अद्याप प्राप्त झालेला नाही. अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्यानुसार पुढील तपास करण्यात येणार आहे. या गुन्ह्याचा तपास योग्य पद्धतीने सुरू असल्याची माहिती तपासी अधिकारी तथा कुडाळ पोलीस निरीक्षक विकास बडवे यांनी दिली. दरम्यान स्मिता माने यांचा मृतदेह कोल्हापूर येथून शवविच्छेदन झाल्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यात आणण्यात आला त्यानंतर स्मिता माने यांचे माहेर असलेल्या मालवण तालुक्यातील कुंभारमाठ येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg