चिपळूण (ओंकार रेळेकर) : मुंबईतील भांडुप येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य दिवाळी किल्ला स्पर्धेच्या मुख्य परीक्षकपदाचा मान चिपळूणचे किल्ले अभ्यासक व इतिहासप्रेमी मार्तंड माजलेकर यांना मिळाला. त्यांच्या ऐतिहासिक ज्ञानाची आणि गडकिल्ल्यांच्या अभ्यासाची दखल घेत उत्साही मित्र मंडळाने त्यांना विशेष आमंत्रित केले होते. यावेळी मंडळाच्या वतीने त्यांचा शाल, श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. भांडुपमधील प्रसिद्ध उत्साही मित्र मंडळाच्या वतीने दरवर्षी दिवाळीनिमित्त भव्य किल्ला स्पर्धेचे आयोजन केले जाते. यंदाही ही स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली. या स्पर्धेत सुमारे ३० किल्ल्यांचा समावेश होता. मुलांनी अत्यंत कल्पकतेने आणि मेहनतीने साकारलेल्या या किल्ल्यांमधून छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आणि गडकोटांविषयीची आत्मीयता दिसून आली.
स्पर्धेचे परीक्षण करताना किल्ल्यांची रचना, ऐतिहासिक अचूकता, कल्पकता, मांडणी, स्वच्छता तसेच मुलांनी घेतलेली मेहनत अशा विविध निकषांचा विचार करण्यात आला. भांडुपमधील उच्चभ्रू सोसायट्यांपासून चाळ संस्कृती आणि कोकण नगरसारख्या डोंगराळ भागांपर्यंत विविध ठिकाणी उभारण्यात आलेल्या किल्ल्यांनी लक्ष वेधून घेतले. चिपळूण येथून खास भांडुप येथे उपस्थित राहून स्पर्धेचे परीक्षण केल्याबद्दल उत्साही मित्र मंडळाने मार्तंड माजलेकर यांचा सन्मान केला. त्यांच्या अनुभवाचे आणि गडकिल्ल्यांविषयी असलेल्या सखोल अभ्यासाचे मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी विशेष कौतुक केले. यावेळी बोलताना मार्तंड माजलेकर म्हणाले की, किल्ल्यांचा अभ्यास करताना किल्ला स्पर्धेचे परीक्षण करण्याची संधी मिळणे हा त्यांच्यासाठी वेगळा आणि आनंददायी अनुभव होता.
मंडळाने आपल्या अनुभवावर विश्वास ठेवून महत्त्वाची जबाबदारी सोपवली आणि सन्मान केला, याबद्दल त्यांनी आभार व्यक्त केले. मुलांनी घेतलेली मेहनत आणि भांडुपसारख्या शहरात मोठ्या प्रमाणावर साकारलेले किल्ले कौतुकास्पद असल्याचेही त्यांनी सांगितले. दिवाळी किल्ला स्पर्धेच्या माध्यमातून लहान मुलांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज, त्यांचे गड-किल्ले आणि महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासाविषयी आवड निर्माण होत आहे. नव्या पिढीकडून ही ऐतिहासिक परंपरा उत्साहाने जपली जात असल्याचे या स्पर्धेतून अधोरेखित झाले.चिपळूणच्या मार्तंड माजलेकर यांना मुंबईत मुख्य परीक्षक म्हणून मिळालेला हा बहुमान शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा ठरला असून, त्यांच्या या यशाबद्दल चिपळूणमधून अभिनंदन होत आहे.


_(1).jpg)
_(1).jpg)












































_(1)_(1).jpg)





1.jpg)
_(1).jpg)
.jpg)


































.jpeg)



















































.jpg)


















.jpg)











































































































































































































































































































































































































.jpg)

.jpg)














_(1).jpg)























2.jpg)




















































.jpg)




































8.jpg)


















































































































































































.jpg)

.jpg)


































































_(1).jpg)





















































































































































































































































































































































































7.jpg)




























_(1).jpg)






























13.jpg)















_(1)_(1).jpg)

















































































.jpg)


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)


























































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.