loader
Breaking News
Breaking News
Foto

कुणकेश्वर हायस्कूलच्या खेळाडूंची तालुकास्तरीय स्पर्धेत खेळाडूंची चमकदार कामगिरी, जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड

देवगड (प्रतिनिधी) - क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे आणि जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग यांच्या सहकार्याने शेठ म. ग. हायस्कूल, देवगड येथे आयोजित तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत माध्यमिक विद्यामंदिर, कुणकेश्वरच्या खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली. या स्पर्धेत प्रथम व द्वितीय क्रमांक मिळविणाऱ्या खेळाडूंची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. १४ वर्षांखालील मुले-मुली गटात सार्थक दीपक घाडी याने २०० मीटर धावणे, तर करण सुरेश कदम याने ६०० मीटर धावणे या प्रकारांत प्रथम क्रमांक मिळविला. मुलींच्या गटात शुभ्रा सचिन धावडे हिने २०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

१७ वर्षांखालील मुले-मुली गटात गार्गी गणेश बाईत हिने ४०० मीटर हर्डल्समध्ये प्रथम, तर सृष्टी गणेश लब्दे हिने याच प्रकारात द्वितीय क्रमांक मिळविला. सर्वेश रामदास तेली याने ११० मीटर हर्डल्समध्ये तृतीय क्रमांक पटकावला. या यशस्वी खेळाडूंना क्रीडाशिक्षक बाळासाहेब ढेरे यांचे मार्गदर्शन लाभले. खेळाडूंच्या या यशाबद्दल संस्थाध्यक्ष चंद्रकांत घाडी, उपाध्यक्ष तुकाराम तेली, सचिव संकेत लब्दे, खजिनदार रावजी वाळके, संस्थेचे पदाधिकारी, मुख्याध्यापक संजय राणे, कुणकेश्वर केंद्रप्रमुख देवकी शिंदे, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच ग्रामस्थांनी अभिनंदन करून जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg