loader
Breaking News
Breaking News
Foto

खेड आणि पूर्णगड येथून दोन २१ वर्षीय तरुणींचे गूढ अपहरण; गुन्हा दाखल

खेड (प्रतिनिधी) : रत्नागिरी जिल्ह्यात अपहरणाच्या दोन वेगवेगळ्या घटना समोर आल्या आहेत. खेड आणि पूर्णगड पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दोन २१ वर्षीय तरुणींचे गूढरित्या अपहरण झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दोन्ही प्रकरणी पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, एक तरुणी खेड शहर परिसरातून तर दुसरी तरुणी पूर्णगड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पावस - पूर्णगड परिसरातून बेपत्ता झाली आहे. नातेवाईकांनी सर्वत्र शोध घेतल्यानंतरही मुलींचा पत्ता न लागल्याने कुटुंबीयांनी पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली.

टाईम्स स्पेशल

या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम १४०(३) अन्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. दोन्ही तरुणींचा शोध युद्धपातळीवर सुरू असून, पोलिसांकडून तांत्रिक तपास आणि सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली जात आहे. या घटनेमुळे खेड आणि रत्नागिरी परिसरात खळबळ उडाली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg