देवगड (प्रतिनिधी) - देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी तसेच अन्य तांत्रिक कारणांसाठी कोणतीही पूर्वसूचना न देता वारंवार वीजपुरवठा खंडित केला जात असल्याने देवगड-जामसंडे शहरातील नागरिक, छोटे व्यावसायिक, हॉटेल व्यावसायिक आणि पर्यटन व्यावसायिकांना आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. या प्रकाराच्या निषेधार्थ महाराष्ट्र लोकाधिकार समितीच्या वतीने बुधवार, ४ नोव्हेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता महावितरणच्या देवगड येथील कार्यालयासमोर निषेध व धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. महाराष्ट्र लोकाधिकार समितीचे जिल्हाध्यक्ष तथा प्रदेशाध्यक्ष ॲड. प्रसाद करंदीकर यांनी महावितरणच्या उपकार्यकारी अभियंत्यांना दिलेल्या निवेदनातून ही भूमिका मांडली आहे.
वीज ही आजच्या काळातील केवळ मूलभूत सुविधा नसून सर्वसामान्य नागरिकांच्या दैनंदिन जीवनाचा आणि व्यवसायाचा अविभाज्य भाग बनली आहे. विशेषतः पर्यटनावर अवलंबून असलेल्या व्यावसायिकांचा रोजगार आणि आर्थिक व्यवहार वीजपुरवठ्यावर अवलंबून असतात. मात्र, देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी किंवा अन्य तांत्रिक कारणांसाठी अचानक वीजपुरवठा बंद केला जातो. काही वेळा याबाबतची पूर्वसूचनाही दिली जात नसल्याने नागरिकांची गैरसोय होते, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे हॉटेलमधील कामकाज, खाद्यपदार्थांची तयारी, पाणीपुरवठा, ऑनलाइन व्यवहार, दुकाने आणि इतर आवश्यक सेवा विस्कळीत होतात. पर्यटन हंगामात अशा प्रकारामुळे पर्यटकांच्या अनुभवावरही विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. मोठ्या उद्योगांप्रमाणे पर्यायी व्यवस्था उभारण्याची आर्थिक क्षमता प्रत्येक छोट्या व्यावसायिकाकडे नसते. त्यामुळे त्यांना मर्यादित उत्पन्नात आर्थिक नुकसान सहन करावे लागते, याकडे समितीने लक्ष वेधले आहे.
या पार्श्वभूमीवर स्थानिक पर्यटन व्यावसायिक, नागरिक, ग्राहक आणि व्यापारी यांच्या सहभागातून महावितरणच्या मनमानी कारभाराविरोधात लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येणार आहे. हे आंदोलन शांततेत पार पाडून कायदा व सुव्यवस्था राखण्यात येईल, असेही निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र, आंदोलनाला गालबोट लावण्यासाठी काही समाजकंटकांकडून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करण्याचा प्रयत्न झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधितांवर राहील, असे समितीने नमूद केले आहे. या निवेदनाच्या प्रती पालकमंत्री तथा मत्स्य व बंदर विकास मंत्री नितेश राणे, जिल्हाधिकारी, महावितरणचे वरिष्ठ अधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, देवगड नगरपंचायत मुख्याधिकारी आणि देवगड पोलीस निरीक्षक यांना माहिती व योग्य कार्यवाहीसाठी पाठविण्यात आल्या आहेत.







_(1).jpg)























2.jpg)




















































.jpg)




































8.jpg)


















































































































































































.jpg)

.jpg)


































































_(1).jpg)





















































































































































































































































































































































































7.jpg)




























_(1).jpg)






























13.jpg)















_(1)_(1).jpg)

















































































.jpg)


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)






































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.