loader
Breaking News
Breaking News
Foto

राज्य उत्पादन शुल्क, भरारी पथक, रत्नागिरीची धडक कारवाई, हातखंबा येथे परराज्यातील दारुची वाहतुक दरम्यान मदयाचा साठा जप्त

रत्नागिरी - राज्य उत्पादन शुल्कच्या रत्नागिरीतील भराराी पथकाने धडक कारवाई करुन हातखंबा येथे दारुची वाहतूक करणारे वाहनातील दारुचा साठा असलेला मुद्देमाल जप्त करण्याची कारवाई केली. डॉ. राजेश देशमुख, आयुक्त सो, राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य, मुंबई, प्रसाद सुर्वे सो, संचालक (अंमलबजावणी व दक्षता), स्नेहलता नरवणे, विभागीय उपायुक्त सो, राज्य उत्पादन शुल्क, कोल्हापूर विभाग कोल्हापूर व किर्ती शेडगे, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, रत्नागिरी यांचे मार्गदर्शनाखाली मिळालेल्या गुप्त बातमीनुसार मौजे हातखंबा गोवा मुंबई हायवे क्र.६६ वरील हॉटेल सदानंद समोरील गोवा ते मुंबई जाणा-या रस्त्यावर ता. जि. रत्नागिरी या ठिकाणी एक सहाचाकी वाहनासह बेकायदेशीररित्या परराज्यातील गोवा राज्यनिर्मित मदयाचा मोठ्या प्रमाणात अवैधरित्या साठवणूक करुन वाहतुक करत असताना मुद्देमाल जप्त केला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

त्याचा तपशील पुढीलप्रमाणे- महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत असलेला व फक्त गोवा राज्यात विक्रीस असलेले रॉयल ब्लू व्हिस्की या ब्रँण्डचे एकूण १४०० कागदी पुठठयाचे बॉक्स (१२०९६ ब.लि) व एक सहाचाकी वाहन अशोक लेलंड कंपनीचा ट्रक रजि.नं. एम एच ११ डीव्ही ७९१४ पांढ-या रंगाचा असा एकूण किंमत रु. १,७५,९४,०००/- (एक कोटी पंचाहत्तर लाख चौ-याण्णव हजार रुपये मात्र) चा मुद्देमाल गुन्हा रजि. क्र. ३६७/२०२६ नुसार नोंद करुन जप्त करण्यात आला आहे. सदर गुन्हयातील बेकायेदशीर गोवा मदयाची एकुण किंमत रु.१,४७,८४,०००/- एवढी आहे. सदर गुन्हयातील वाहनचालक संशयित आरोपीत सचिन भीमराव सपकाळ, रा. मु.पो.शिवघर, बौध्दवस्ती ता. जि. सातारा याचे विरुध्द महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४९ चे कलम ६५ (अ, ई), ८९, ८३ व ९० अन्वये नुसार वारस गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

टाईम्स स्पेशल

सदर कार्यवाही श्रीमती किर्ती शेडगे, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, रत्नागिरी यांचे मार्गदर्शनाखाली ए.ए. पाडळकर, निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, भरारी पथक, रत्नागिरी, दु.निरीक्षक पी.ए.गुरव, सोबत जवान मानस पवार, जवान नि वाहनचालक अतुल वसावे, जवान अनुराग बर्वे, जवान नि वाहनचालक विशाल विचारे, जवान विशाल भोसले, जवान निलेश तुपे व जवान सागर टिकार यांनी सदर कारवाई केली. सदर गुन्हयाचा तपास अमित पाडळकर, निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क, भरारी पथक, रत्नागिरी हे करत आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg