खेड : खेड तालुक्यात स्मार्ट मीटर बसविण्याच्या प्रक्रियेदरम्यान सर्वसामान्य वीज ग्राहकांकडून व्यक्त करण्यात येत असलेल्या तक्रारी व शंकांच्या पार्श्वभूमीवर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले), खेड तालुका आक्रमक झाली आहे. स्मार्ट मीटरबाबत ग्राहकांना पारदर्शक माहिती द्यावी, बिलिंगमधील तफावत दूर करावी आणि ग्राहकांच्या तक्रारींचे तातडीने निराकरण करावे, अशी मागणी पक्षाने केली आहे. महावितरण प्रशासनाने या प्रश्नावर सात दिवसांच्या आत ठोस कार्यवाही करावी, अन्यथा खेड येथील महावितरण कार्यालयावर धडक मोर्चा काढून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा रिपब्लिकन पक्षाने दिला आहे. यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले), कोकण प्रदेश युवक अध्यक्ष सुशांतभाई सकपाळ यांनी महावितरण प्रशासनाला स्पष्ट इशारा दिला.
स्मार्ट मीटरच्या नावाखाली सर्वसामान्य ग्राहकांवर कोणताही अतिरिक्त आर्थिक भार पडत असेल, तर तो आम्ही कदापि सहन करणार नाही. ग्राहकांच्या प्रश्नांवर प्रशासनाने संवेदनशीलतेने भूमिका घ्यावी. सत्तेत सहभागी असलो तरी जनतेवर अन्याय होत असेल तर आम्ही गप्प बसणार नाही. सात दिवसांत तक्रारींचे समाधानकारक निराकरण झाले नाही, तर रिपब्लिकन पक्ष खेडच्या रस्त्यावर उतरेल आणि महावितरण कार्यालयावर धडक मोर्चा काढेल. स्मार्ट मीटर बसविण्यापूर्वी जुन्या मीटरचे रीडिंग व स्थिती ग्राहकांना कळवावी, नवीन मीटरची कार्यपद्धती व बिलिंग प्रक्रिया स्पष्ट करावी, तसेच मीटरबाबत तक्रार असल्यास तातडीने तांत्रिक तपासणीची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
वीज ग्राहक हा महावितरणचा केवळ बिल भरणारा ग्राहक नसून त्याचेही अधिकार आहेत. त्या अधिकारांचे संरक्षण करणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे, अशी भूमिका रिपब्लिकन पक्षाने घेतली आहे. महावितरणने सात दिवसांच्या मुदतीत सकारात्मक निर्णय न घेतल्यास महावितरण कार्यालयावर मोर्चा, निदर्शने आणि पुढील तीव्र लोकशाही आंदोलन करण्यात येईल, असा इशारा रिपब्लिकन पक्षाच्या वतीने देण्यात आला आहे. जनतेच्या हक्कासाठी लढताना कोणत्याही दबावाला बळी पडणार नाही. ग्राहकांना न्याय मिळेपर्यंत हा लढा सुरूच राहील, असा निर्धार सुशांत भाई सकपाळ यांनी व्यक्त केला.











































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)
























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)


































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.