चिपळूण (सत्यवान विचारे) - कोकणच्या साहित्य, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात मोलाचे योगदान देणारे साहित्यभूषण, कवी, लेखक, समाजसुधारक आणि ज्येष्ठ विधिज्ञ वि. ल. बर्वे ऊर्फ ‘कवि आनंद’ यांच्या निवासस्थानी त्यांच्या स्मृती जतन करण्याच्या उद्देशाने नीलचित्राची स्थापना करण्यात आली. नुकतेच या नीलचित्राचे अनावरण आमदार संजय केळकर यांच्या हस्ते समारंभपूर्वक करण्यात आले. आपल्या आजोबांच्या स्मृतींना उजाळा देणारा हा क्षण माझ्यासाठी भाग्याचा आणि आयुष्यभर स्मरणात राहणारा असल्याची भावना आमदार संजय केळकर यांनी यावेळी व्यक्त केली.
चिपळूण येथील सुमारे २०० वर्षांची ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिर संस्थेच्या पुढाकारातून हा उपक्रम राबविण्यात आला. पुढील पिढ्यांना वि. ल. बर्वे यांच्या कार्याची आणि विचारांची ओळख व्हावी, त्यांच्या साहित्यिक व सामाजिक योगदानाचे स्मरण कायम राहावे, या उदात्त हेतूने त्यांच्या निवासस्थानी नीलचित्र उभारण्यात आले. यावेळी वाचन मंदिराच्या संचालकांनी आपल्या मनोगतात या उपक्रमामागील संकल्पना स्पष्ट करताना वि. ल. बर्वे यांच्या जीवनातील अनेक आठवणींना उजाळा दिला. साहित्य क्षेत्राबरोबरच सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीतही त्यांनी दिलेले योगदान अधोरेखित केले. विशेष म्हणजे, त्या काळातील अस्पृश्यतेच्या रूढींना धक्का देत वि. ल. बर्वे यांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या उपस्थितीत स्पृश्य-अस्पृश्य समाजबांधवांचा सहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. सामाजिक समतेच्या दिशेने टाकलेले हे क्रांतिकारी पाऊल होते. या ऐतिहासिक घटनेचा उल्लेख स्वतः भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ‘बहिष्कृत भारत’ या ग्रंथात केल्याचेही यावेळी सांगण्यात आले.
आपले आजोबा वि. ल. बर्वे ऊर्फ कवि आनंद यांच्या विचारांचा वारसा लाभणे हे आपले भाग्य असल्याचे सांगताना आमदार संजय केळकर म्हणाले की, समता, सामाजिक समरसता आणि सामाजिक न्यायाचे संस्कार आपल्याला त्यांच्याकडूनच मिळाले. चिपळूणमध्ये त्यांच्या स्मृती जतन करण्यासाठी असा उपक्रम सुरू झाल्याचा मनस्वी आनंद आहे. इतिहास केवळ पुस्तकांमध्ये न राहता तो पुढील पिढ्यांसमोर जिवंत राहावा, या दृष्टीने लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराने उचललेले हे पाऊल निश्चितच कौतुकास्पद आहे. या उपक्रमाबद्दल आमदार संजय केळकर यांनी संस्थेचे अभिनंदन केले.







_(1).jpg)























2.jpg)




















































.jpg)




































8.jpg)


















































































































































































.jpg)

.jpg)


































































_(1).jpg)





















































































































































































































































































































































































7.jpg)




























_(1).jpg)






























13.jpg)















_(1)_(1).jpg)

















































































.jpg)


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)






































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.