loader
Breaking News
Breaking News
Foto

आदर्श सरपंच सन्मान सोहळ्याच्या मानकरी आबलोलीच्या वैष्णवी नेटके, मान्यवरांच्या उपस्थितीत अहिल्यानगर येथे पुरस्कार सोहळा उत्साहात

आबलोली (संदेश कदम) - महाराष्ट्र शासन, ग्रामीण विकास व पंचायत राज विभाग, महाराष्ट्र राज्य यांच्या ततीने राज्यात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणान्या सरपंचांचा गौरव करण्यासाठी आयोजित करण्यारा आलेल्या "आदर्श सरपंच सन्मान सोहळा २०२६' अंतर्गत गुहागर तालुक्यातील आबलोली गावच्या सरपंच वैष्णवी वैभव नेटके यांचा आदर्श सरपंच सन्मान सोहळा २०२६' या मानाच्या पुरस्कारने सन्मान करण्यात आल्या. हा भव्य सन्मान सोहळा अहिल्यानगर येथे राज्यातील विविध मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न झाला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी मंचावर राज्याचे सरपंच संघटनेचे अध्यक्ष व मार्गदर्शक बाबासाहेब पावसेपाटील, प्रदेशाध्यक्ष रोहित संजय पवार, सुजाता कासार विश्वस्त, रवींद्र पवार संघटक, अमोल शेवाळे राज्य संपर्क प्रमुख, रवींद्र पावसे कार्याध्यक्ष व इतर मान्यवर, पदाधिकारी, ग्रामविकास विभागाचे अधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. वैभवी वैभव नेटके यांनी आबलोली गावच्या विकासासाठी केलेले उल्लेखनीय काम, ग्रामस्थांच्या समस्या सोडवण्यासाठी घेतलेला पाठपुरावा, स्वच्छता, पाणीपुरवठा, शिक्षण, आरोग्य, महिला सक्षमीकरण यांसारख्या विविध क्षेत्रातील त्यांच्या सक्रिय कामगिरीची दखल घेऊन हा सन्मान देण्यात आला.

टाईम्स स्पेशल

यापूर्वीही त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. वैष्णवी वैभव नेटके यांनी आपल्या मनोगतात ग्रामस्थांच्या विश्वासाला यापुढेही पात्र ठरण्याचा प्रयत्न करणार असल्यांचे सांगितले. "हा सन्मान माझा नसून आबलोली गावातील प्रत्येक ग्रामस्थांचा आहे. गावाच्या सर्वांगीण विकासासाठी मी सदैव प्रयत्नशील राहीन," असे त्यांनी यावेळी नमूद केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg