loader
Breaking News
Breaking News
Foto

आरेकर प्रतिष्ठानच्या माध्यमातून महिलांना रोजगार उपलब्ध

वरवेली (गणेश किर्वे) - लोकनेते स्व. सदानंद आरेकर प्रतिष्ठान गुहागर संस्थेच्या माध्यमातून कै.अर्जुनराव भागडे यांच्या स्मरणार्थ कीर्तनवाडी कोकणी पापड महिला गृह उद्योग गटाला पापड मशीन भेट देण्यात आली. आज उद्घाटन आणि प्रशिक्षक कार्यक्रम पार पडला. महिलांना रोजगार मिळवा या उद्देशाने लो. स्व. सदानंद आरेकर प्रतिष्ठान ही संस्था कायम कार्यरत असते, याच उद्देशाने आज गुहागरमधील कीर्तनवाडी या ठिकाणी पापड व्यवसाय करण्यासाठी महिलांसाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष साहिल आरेकर, स्वामिनी कौशल्य विकास संस्था अध्यक्ष स्वरा सावंत, नगरसेवक राजेंद्र भागडे, माजी नगराध्यक्ष स्नेहाताई भागडे, नगरसेवक सौरभ भागडे, गजानन जोशी, रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा व्यवस्थापक जनार्दन भागडे, मधुकर भागडे, किशोर भागडे, अंन्विता मांडवकर, पार्वती फटकरे, गजानन फटकरे, दत्ताराम भागडे, सुलोचना भागडे, सदानंद जोशी, संदेश भागडे, अरुण भागडे, महेंद्र जोशी आदी उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg