loader
Breaking News
Breaking News
Foto

२१ दिवस भक्त बाप्पाच्या भक्तीत तल्लीन; ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात देवरुखच्या राजाला भावपूर्ण निरोप

संगमेश्वर (मकरंद सुर्वे) - तब्बल २१ दिवस भक्तांच्या मनावर अधिराज्य गाजविणार्‍या देवरुखच्या राजाला अखेर भक्तिमय वातावरणात भावपूर्ण निरोप देण्यात आला. ढोल-ताशांचा गजर, ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’चा जयघोष आणि डोळ्यांच्या कडा पाणावलेल्या अशा भावनिक वातावरणात देवरुखच्या राजाचे विसर्जन करण्यात आले. देवरुख येथील हनुमान मंदिरात विराजमान झालेल्या बाप्पाच्या दर्शनासाठी गेल्या २१ दिवसांपासून भाविकांची मोठी गर्दी होत होती. सकाळच्या आरतीपासून रात्रीच्या सांस्कृतिक कार्यक्रमांपर्यंत संपूर्ण परिसर भक्ती आणि उत्साहाने भारून गेला होता. लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत प्रत्येकाने या उत्सवात मनापासून सहभाग घेतला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

२१ दिवस बाप्पाच्या सेवेत रमलेले कार्यकर्ते आणि भाविकांसाठी विसर्जनाचा क्षण मात्र अत्यंत भावूक करणारा ठरला. बाप्पाला निरोप देताना अनेकांच्या डोळ्यांत अश्रू तरळले. ‘बाप्पा, पुढच्या वर्षी लवकर या’, अशी आर्त साद देत भक्तांनी आपल्या लाडक्या गणरायाला निरोप दिला. विसर्जन मिरवणुकीत पारंपरिक वाद्यांचा निनाद, ढोल-ताशांचा दणदणाट आणि भक्तांचा उत्स्फूर्त सहभाग यामुळे देवरुख नगरीत अक्षरशः भक्तीचा सागर दाटून आला होता. अबालवृद्धांनी मिरवणुकीत सहभागी होत बाप्पाच्या चरणी आपली श्रद्धा अर्पण केली.

टाईम्स स्पेशल

२१ दिवसांच्या या उत्सवात दररोज विविध धार्मिक, सांस्कृतिक आणि मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. अनेकांच्या सहकार्याने हा उत्सव यशस्वीपणे पार पडला. उत्सव संपला असला तरी २१ दिवस बाप्पाच्या सहवासात अनुभवलेली भक्ती, आनंद आणि एकोप्याच्या आठवणी देवरुखकरांच्या मनात कायम राहणार आहेत. बाप्पा विसर्जित झाला... पण भक्तांच्या मनातील ‘देवरुखचा राजा’ मात्र कायमचा विराजमान झाला!

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg