loader
Breaking News
Breaking News
Foto

दीड वर्ष उलटले तरीही स्वीकृत नगरसेवक नाहीत, शिवसेना ठाकरे गटाचे ढोल -ताशे आंदोलन

डोंबिवली (शंकर जाधव) - कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या निवडणुकीला दीड वर्ष उलटली तरी अजून स्वीकृत नगरसेवक निवड करण्यात आली नाही. सत्ताधारी यावर मौन घेत असून विरोधी पक्षांनी मात्र यावर अनेक वेळेला आवाज उठविला होता. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने कल्याण मुख्यालयासमोर ढोल - ताशे वाजवून आंदोलन केले. जोवर स्वीकृत नगरसेवक निवड होत नाही तोवर प्रत्येक दिवशी मुख्यालयासमोर ढोल - ताशे वाजवू असेही यावेळी सांगण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे गटनेते उमेश बोरगांवकर म्हणाले, कल्याण डोंबिवली महानगरपालिका तौलनिक संख्याबळानुसार नामनिर्देशित सदस्यांची नियुक्ती करण्यास जाणीवपुर्वक विलंब होत असल्याच्या निषेधार्थ प्रशासनास व सत्ताधाऱ्यांना जाग येण्यासाठी महापालिका मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावर ढोल ताशाचा नाद करण्यात येत आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर स्वीकृत नगरसेवक निवडणुकीबाबत सत्ताधारी पक्षांनी मौन ठेवले आहे. यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी जाब विचारला आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg