loader
Breaking News
Breaking News
Foto

मानेज इंटरनॅशनल स्कूलमध्ये 'बालविवाह निर्मूलन' जनजागृती कार्यक्रम संपन्न

रत्नागिरी : प्रबोधन शिक्षण प्रसारक संस्था संचलित कुवारबाव येथील मानेज इंटरनॅशनल स्कूलमध्ये 'बालविवाह व सक्तीचे विवाह निर्मूलन' यासाठी जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला अन्वी शिंदे आणि शितल शितप यांची उपस्थिती लाभली. या कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांमध्ये बालविवाह निर्मूलनाबाबत जागरूकता निर्माण होण्याच्या दृष्टीने तसेच बालविवाहाचे दुष्परिणाम आणि बालहक्क यांविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन अन्वी शिंदे यांनी केले. त्याचबरोबर 'बालविवाह व सक्तीचे विवाह निर्मूलन' याबाबत विद्यार्थ्यांकडून प्रतिज्ञा घेण्यात आली. समाजातील प्रत्येक घटकाने बालविवाह रोखण्यासाठी पुढाकार घेणे आवश्यक असून, बालकांचे शिक्षण, आरोग्य आणि उज्ज्वल भविष्य सुरक्षित करण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करावेत, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश होता.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

बालविवाह ही बालकांच्या मूलभूत हक्कांचे उल्लंघन करणारी गंभीर सामाजिक समस्या असून त्यामुळे बालकांच्या शिक्षणावर, आरोग्यावर, व्यक्तिमत्त्व विकासावर तसेच सुरक्षित व सन्मानपूर्वक जीवन जगण्याच्या अधिकारावर विपरीत परिणाम होऊ नये त्याचबरोबर बालविवाह प्रतिबंधक अधिनियम 2006 ची प्रभावी अंमलबजावणी व्हावी आणि बालविवाहमुक्त समाज निर्माण व्हावा, या उद्देशाने शासनाच्या वतीने असे जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात येत आहेत. महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभाग तसेच जिल्हा बाल संरक्षण कक्ष, रत्नागिरी व शाळेच्या मुख्याध्यापिका सुमन अरोरा यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम शाळेत राबविण्यात आला.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg